Geography, asked by choudhrivaman66, 2 months ago

अ) पाठातील विनोद निर्माण करणारी पाच बाक्ये शोधा. ती तुम्हाला का आवडली ते सकारण लिहा.
सतत ताचे मत लिहा​

Answers

Answered by ramchandrashinde75
0

Answer:अ) आधुनिक मराठी वाङ्‌मयातल्या विनोदी लेखनाचा कालखंड श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७१-१९३४) यांच्या लेखनानं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. कोल्हटकरांच्या आधीच्या काळातल्या मराठी वाङ्‌मयात विनोद मुबलक प्रमाणात नसला, तरी विनोदाचा अगदीच अभाव नव्हता. त्या काळातल्या साहित्यात विनोदाचा वापर हा मुख्यत: गंभीर कथानकाचा ताण कमी करण्यासाठी केला जायचा. त्यामुळे विनोदाला साहित्यामध्ये दुय्यम स्थान होतं. १९व्या शतकातल्या मराठी वाङ्‌मयातला विनोद प्रामुख्याने किस्से, चुटके, आख्यायिका अशा फुटकळ स्वरूपात होता. तमाशा आणि फार्स या कलाप्रकारांतूनही तो व्यक्त होऊ लागला होता.

इंग्रजांच्या राजवटीत अनेक नियतकालिकं आणि पुस्तकं भारतात आली. त्यामुळेच भारतीयांना पाश्चात्त्य वाङ्‌मयातल्या विनोदाची ओळख झाली. त्यातूनच उपहास, उपरोध, कोटी या विनोदाच्या प्रकारांचा आणि विनोदनिर्मितीच्या विविध तंत्रांचा परिचय झाला. हे वाङ्‌मय वाचून कोल्हटकरांना विनोदी लेखनाची प्रेरणा मिळाली. पाश्चात्त्य लेखकांच्या विनोदनिर्मितीची तंत्रं वापरून कोल्हटकरांनी आपल्या देशातील अनेक सामाजिक समस्यांवर लेखन करायला सुरुवात केली.

कोल्हटकरांनी १९०२ साली 'साक्षीदार' हा निबंध लिहिला. तो आधुनिक मराठी वाङ्‌मयातला पहिला विनोदी निबंध मानला जातो. कोल्हटकरांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट, निरर्थक आणि खुळचट प्रथा हास्यास्पद ठरवण्यासाठी विनोदी निबंध लिहिले. या प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा, याची तळमळ त्यांना लागून राहिली होती. या रूढींवर सरळसरळ कोरडे ओढण्याऐवजी कोल्हटकरांनी हसतखेळत त्यांचा उपहास केला. व्रतवैकल्यं, पाप-पुण्य, सणवार, सोवळंओवळं या विषयांसंबंधीचे सामाजिक आचारविचार किती प्रतिगामी आणि हास्यास्पद आहेत याची जाणीव कोल्हटकरांनी आपल्या विनोदी लेखनातून करून दिली.

Similar questions