(अ) सामाजिक आरोग्य बिघडवणारे रोग
Answers
Answer:
सामजिक आरोग्य म्हणजे आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे. सामाजिक प्रश्न किंवा अडचणी सोडवण्याचा आपणहून प्रयत्न करणे असे म्हणता येईल.
आपले आरोग्य खालील गोष्टींवर अवलंबून असते.
अनुवंशिकता
सभोवतालचे वातावरण व जीवन
जीवन पद्धती
आहार व पोषण
आरोग्य व औषधोपचार सेवा
समाजाची आर्थिक स्थिती
इतर गोष्टी जसे शिक्षण, शेती, उद्योगधंदा, ग्रामीण विकास इ.
सामजिक आरोग्य चांगले नसणे म्हणजे (आजार)
अगदी सहजपणे नेहमीची कामे करता न येणे किंवा त्यात अडचणी येणे म्हणजे आजार किंवा रोग.
लक्षणे
नेहमीची कामे न करता येणे, म्हणजे घरातील कामे, शेतीतील कामे, व्यवसायातील कामे
नीट विचार न करता येणे
मन गोंधळून जाणे
लक्ष न लागणे
निर्णय घेता न येणे
निरुत्साही वाटणे
भांडणे काढणे, वैर निर्माण करणे
सामाजिक कार्यक्रमांमध्ये उदा. लग्न समारंभ, मेळावे, यात्रा, नातेवाईकांच्या गाठीभेटी इ. गोष्टी नकोशा वाटणे.
उपाय
सकस आहार घेणे
स्वच्छता राखणे
करमणूक किंवा मनोरंजन साधने यांचा वापर करणे.
व्यायाम व विश्रांती
समाजामध्ये मिसळणे
इतरांच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होणे
ताण-तणाव व काळजी कमी करणे
नातेवाईक व मित्रांमध्ये चांगले हितसंबंध प्रस्थापित करणे.
सामाजिक आरोग्य चांगले असेल तर
सर्वांमध्ये मनमोकळेपणाने मिसळता येते.
इतरांच्या अडी-अडचणी सोडवण्यात मदत करता येते.
कोणतेही काम सहजपणे करता येते.
कुटुंबातील व समाजातील लोकांना आधार देता येतो.
वैयक्तीक, कौटुंबिक, सामाजिक अडी-अडचणी सोडविता येतात.
समाजामध्ये मन मिळतो.
समाजात सुख- शांती नांदावी यासाठी उत्साहाने प्रयत्न करता येतो.
चांगले निर्णय घेता येऊ शकतात. ( वैयक्तीक, कौटुंबिक, आर्थिक,