A short essay on sant tukaram in marathi
Answers
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड विधान तुकोबाराय अभिमानाने करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले.देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.
Answer:
महाराष्ट्र ही महान संतांची भूमी मनाली जाते. या भारत भूमीवर अनेक महान संतांचा जन्म झाला आहे.
त्या सर्व संतांपैकी संत तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील वारकरी कवी – संत होते. संत तुकाराम महाराज हे अखंड आणि भक्तिमय कवितांसाठी ओळखले जातात.
संत तुकाराम महाराजांनी भगवान विष्णूचे अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान विठोबा यांच्यावर कविता केल्या आहेत. संत तुकाराम हे तुकोबा, तुकोबाराय आणि तुकाराम महाराज या नावानी प्रसिद्ध होते.
जन्म
संत तुकाराम महाराज यांचा जन्म इ. स १५९८ साली पुण्याजवळील देहू येथे झाला. संत तुकाराम महाराज यांचा जन्म वसंत पंचमी – माघ पंचमीला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव ‘बोल्होबा’ आणि आईचे नाव ‘कनकाई’ असे होते.
बोल्होबा आणि कनकाई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या संत तुकाराम यांचे आडनाव अंबिले असे होते. पंढरपूरचा विठ्ठल हा त्याचे आराध्य दैवत होते. त्यांच्या घराण्यात पंढरपूरची वारी करण्याची परंपरा होती. सावजी हा त्यांचा मोठा भाऊ आणि कान्होबा हा त्यांचा धाकटा भाऊ होता.
त्यांचा मोठा भाऊ हा विरक्त वृत्तीचा होता. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी ही संत तुकारामांवर होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची मुलगी जिजाई यांच्याशी संत तुकाराम महाराजांचा विवाह झाला.