a short formal letter in marathi
Answers
Answered by
32
■■औपचारिक पत्राचे (formal letter) उदाहरण:■■
◆ तुम्ही दोन दिवस शाळेत उपस्थित राहू शकणार नाही,त्यासाठी मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र:
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
शैलेंद्र विद्यालय,
दहिसर,मुंबई.
विषय: दोन दिवसांची सुट्टी मिळण्याकरिता विनंती पत्र.
आदरणीय गुरुवर्य,
सादर नमस्कार.
मी आपल्या शाळेत इयत्ता सहावी- अ या वर्गात शिकत आहे.आमच्या घरी ३ फेब्रुवारी रोजी सत्यनारायणाची महापूजा आहे.आमच्या घरी खूप पाहुणे येणार आहेत.म्हणून दिनांक २ व ३ फेब्रुवारी या दोन दिवशी मी शाळेत येऊ शकणार नाही.
कृपया मला दोन दिवसांची रजा मंजूर करावी,ही नम्र विनंती.मी माझा राहिलेला अभ्यास नंतर पूर्ण करीन,असे नम्रपणे सांगते.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपली आज्ञाधारक,
कृती म्हात्रे.
(इयत्ता सहावी- अ)
दिनांक : १ फेब्रुवारी, २०२०.
Similar questions