India Languages, asked by DHRUVGHEWADE, 9 months ago

A speech on any one of these topic please in written.
१. माझ्या स्वप्नातील भारत.
२. आॅनलाईन शिक्षण - काळाची गरज.​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

ऑन लाइन शिक्षण ही काळाची गरज आहे शिक्षणामुळे मानवाने खुप मोठया प्रमाणावर उत्क्रांती साध्य केली आहे. शिक्षण घेतल्यामुळे मानवाला आपल्या मूलभूत हक्काचे महत्त्व व सामाजिक कर्तव्य यांची जाणीव होते . परंतु देशावर ओढावलेल्या या कोरोना रुपी संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने लॉक डाऊन सुरू केला परिणामी शाळा बंद राहू लागल्या .विद्यार्थ्यांच्या परीखा ही रद्द झाल्या .विद्यार्थी घरातच बसून राहू लागले .पुढच्या वर्गाचा अभ्यास कसा करावा ? काय करावा ? तो अभ्यास शिक्षकांकडून कसा तपासावा असे अनेक प्रश्न निर्माण झाले .आणि मग त्यावर ऑन लाइन शिक्षण ही संकल्पना पुढे आली व विद्यार्थ्यांना या ऑन लाइन शिक्षणाचा आनंद वाटू लागला .चला जाणून घेऊ या या ऑन लाइन प्रणाली बाबत …या शिक्षणामुळे नवनवीन पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करू लागले . त्यामुळे त्यांच्यातील अज्ञान कमी होत गेले ज्याने ऑन लाइन शिक्षण घेतले ते आपल्या मित्रांना ही हे शिक्षण देऊ लागले . त्यामुळे त्यांच्यातील संवाद वाढला .जे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही असे विद्यार्थी देखील या प्रणाली द्वारे शिक्षण घेऊ शकतात या प्रणालीचा वापरा साठी आपल्या घरात सहजच उपलब्धअसलेल्या मोबाईल ची आवश्यकता आहे .अर्थात कमीत कमी खर्चात आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण घेउ शकतो .काही विद्यार्थी पुस्तकाचे स्वयं अध्ययन करून स्वतःच शिकणे पसंत करतात.काही विद्यार्थ्यांना अध्ययन करतांना शिक्षकाची खूप जास्त मदत अपेक्षित असते.तर काही विद्यार्थ्यांना त्यांना गरज वाटेल तिथेच आणि हवी असेल तेंव्हाच शिक्षकाची मदत अपेक्षित असते.त्यावेळेस या प्रणाली द्वारे विद्यार्थ्यांना लगेचच आपल्या शिक्षकांना फोन द्वारे संपर्क करू शकता . आनंददायी सहज शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढते. पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत प्रत्येक तासिके चे महत्व व अस्तित्व फक्त त्याच वेळी आणि त्याच वर्गात असते. तासिके च्या वेळे अगोदर किंवा नंतर, अथवा इतर वर्गात किंवा घरी विद्यार्थी त्या तासिके चा अनुभव परत घेऊ शकत नाही. प्रत्येक तासिका ही स्वतंत्र आणि नवीन शैक्षणिक कृती असते. तसेच यात शिक्षकाची आवश्यकता असते .परंतु या प्रणालीत योग्य नियोजन केले तर आपल्या वेळेची बचत व शिक्षकाच्या कामाचा ताण कमी होऊ शकते . त्यांना प्रत्येक वर्गात, नवीन तासिका घेण्याचा शिक्षकावरील कार्यभार कमी होत जातो. शाळेत शिक्षक शिक्षक ज्या पद्धती ने शिकवतात त्याच पद्धती ने शिक्षण घ्यावें लागते .

Attachments:
Answered by Anonymous
3

Answer:

okkkkkkkkkkkkkkkkkk

Attachments:
Similar questions