(अ) तुमच्या कनिष्ठ महाविदयालयातील स्नेहसंमेलन. स्पस्त करा ?
Answers
Answer:
Explanation:
आमच्या महाविद्यालयातील स्नेहसंमेलन नुकतेच आमच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलन संपले आणि माझ्या घरातील कपाटात मिळवलेली बक्षिसे विराजमान झाली. खऱ्या अर्थाने मी यंदाचे हे महाविद्यालयीन संमेलन उपभोगले आणि गाजवले ही ! साधारणता: दिवाळीच्या सुट्ट्या पूर्वी स्नेहसंमेलनासाठी पहिली सभा घेण्यात आली. मी मोठ्या चातुर्याने कार्यकरणी शिरकाव केला, खरे पाहता मला सेक्रेटरी व्हायचे होते; पण ते जमले नाही. मग सुट्टीच्या दिवसाचा उपयोग आम्ही स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आखण्यात घालवले. अनेक वेळा मसुदा आपला आणि अनेक वेळा रद्द केला. नाटकाची निवड करताना तशीच गडबड उडाली. बरेच वाद विवाद त्यानंतर एक विनोदी प्रशासनाची निवड झाली. विशेष म्हणजे त्या नाटकात मला एक छोटीशी भूमिका मिळाली. ती भूमिका होती छोटी होती; पण खूप दर्जेदार होती. पुढचे दोन महिने मी अगदी स्नेहसंमेलन त्यामध्ये रंगून गेलो होतो. आई मला मध्येच आठवण करून द्यायची, ' अरे, बारावीचे वर्ष आहे, लक्षात आहे ना तुझ्या ? पण मी काय करणार ? के संमेलनाचा केस मनातला होता.
स्नेहसंमेलन यापूर्वी अनेक स्पर्धा झाल्या. त्यात खेळाच्या स्पर्धा होत्याच, शिवाय काही गमतीदार स्पर्धाही होत्या. या सर्व स्पर्धात माझा सक्रिय सहभाग होता. त्यात मी पाच बक्षिसे मिळवली. प्रत्यक्ष संमेलन काळात गायन, वादन, अभिनय, चित्रकला इत्यादी स्पर्धा झाल्या. त्यात अभिनय व वादन स्पर्धेत मी पहिल्या क्रमांकावर आलो. तर मित्र मैत्रिणी, प्राध्यापकांनी केलेल्या अभिनंदन आणि मी एकदम नाहून निघालो .
स्नेहसंमेलनातील ' विद्यार्थी बिघडला आहे का ?' हा परिसंवाद, शेलापागोटे यांचा कार्यक्रम आणि प्रमुख पाहुण्यांचे भाषण हे तीन कार्यक्रम मला फार आवडले. प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगत विद्यार्थी दशा हा स्व-विकास ला किती आवश्यक आहे, तिथं कसा उपयोग करावा, आणि हेच दिवस पुढील आयुष्यात मंतरलेले कसे ठरू शकतात हे इतक्यात चटकदार पणे व प्रभावीपणे सांगितले की, भाषण ऐकताना सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते.
स्नेह संमेलनाचे सूप वाजले आणि एकदम पोकळी पोकळी वाटू लागली. खूप काही शिकलो, स्वतःची आणि इतर मित्राची खरी ओळख पटली. काही मतभेद संपली आणि काही नवे निर्माण झाले. प्राध्यापकशी जवळीक झाली. त्यामुळे आता पुढील अभ्यासात त्यांची खरी मदत घेता येईल. नेहा संमेलनामुळे महाविद्यालयातील काही छोट्या कलावंताची ओळख झाली; त्याचप्रमाणे कॉलेज कॉन्टॅक्ट म्हणता येईल अशा काही छोट्या शत्रूंची ही चाहूल लागली. असे बरेच काही महाविद्यालयीन स्नेहसंमेलन मला देऊन गेले. आता नव्या जोमाने, उत्साहाने अभ्यासाला लागायला हवे. तेथे उपेक्षित यश मिळवायला हवे. नाहीतर त्याचे खापर स्नेहसंमेलन वर फुटायचे !
तर मित्रांनो असे झाले होते महाविद्यालयातील स्नेहसंमेलन मराठी निबंध | Mahavidyalayatil Sneh Sammelan Marathi Nibandh तुम्हाला कसा वाटला ? मी नेहमी प्रमाणेच मी तुम्हाला शेवटी विचारते पण तुम्ही जर शाळा-महाविद्यालयांमध्ये असाल आणि असे स्नेह संमेलनाचे कार्यक्रम नक्कीच होतात तेव्हा तुमच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवला सांगितला असेल तर सर्वात असली प्रकर्षाने तुम्ही जा कारण येथून तुम्हाला किंवा तुमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळू शकते. लाजायचं, संकोच करायचा ह्या सवयी सोडून सभाधीटपणा( स्टेज डेरिंग), धैर्य तुमच्यामध्ये वाढीस लागते वेगवेगळे प्रमुख पाहुणे, इतर काही सामाजिक मंडळी, नेते इत्यादीं समोर आपले प्रश्न आणि कला आपले विचार मांडण्याची एक संधी तुम्हाला मिळते. आणि विशेष म्हणजे तेथे संपूर्ण शाळा म्हणजे समूह असतो आणि अशाच स्वतःला प्रस्तुत करणे हे तुमच्या व्यक्तिमत्वासाठी खूप प्रेरक आहे. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर अशा विविध कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये, संमेलनामध्ये आवर्जून सहभागी व्हा अभ्यास महत्त्वाचा आहे हे मी मान्य करतो परंतु व्यक्तिमत्व विकास होणेही तेवढेच गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर कलागुण आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये ओळख असणारे अनेक दिग्गज अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेत त्यांचे आजही सन्मानाने नाव काढले जाते त्यांचे जर तुम्ही चरित्र वाचले असतील तर त्यांनी सुद्धा त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये अशाच काही छोट्यामोठ्या गोष्टींमधून आयुष्याला कलाटणी मिळून करिअरची एक नवीन सुरुवात केली आणि आयुष्याला नवीन ओळख दिली तुम्ही सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या संधीचे सोने कराल. कारण वेळेला खूप महत्त्व असते. आणि योग्य गोष्ट करायला योग्य वेळेस लागते