अंधश्रध्दा - कोरोनापेक्षा भयंकर आजार या विषयावर निबंध
Answers
Answer:
सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीत जगभरात आतापर्यंत २८,७३५ इतके मृत्यू झाले आहेत. या साथीपुढे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झालेल्या दिसत आहेत. अगदी सूक्ष्म स्वरूपातील या विषाणूने परिस्थिती चिंताजनक केली आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ हीच आपली प्राथमिकता आहे हे अधोरेखित करायला भाग पाडले आहे. साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत होतोय. जोपर्यंत या विषाणूचे स्वरूप, त्याचा प्रसार आणि व्याप्ती याचा ताळेबंद घालायच्या आताच या विषाणूने व्यस्त प्रमाणात पसरायला सुरुवात केलेली आहे. अजूनतरी या आजारावर लस बनवण्यात विषाणू शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. भारतात देखील कोरोनाची साथ पसरत आहे. भारतात आजच्या घडीला ८७३ केसेस (सरकारी आकड्यानुसार) निदर्शनास आल्या आहेत. मृत्यू १७ झाले आहेत. यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.
गेल्या २४ मार्चला रात्री ८च्या सुमारास देशाला संबोधित करताना २१ दिवसांच्या (१४ एप्रिल पर्यंतची) संचारबंदीची घोषणा पंतप्रधानांनी केली. त्या आधी त्यांनी २२ मार्च रोजी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बरेच कर्तव्यदक्ष लोक अहोरात्र आपल्या जीवाची परवा न करता सेवा देत आहेत. या लोकांप्रती सामजिक कृतज्ञता म्हणून टाळ्या/थाळ्या/शंख इत्यादी आपल्या गॅलरीमधून किंवा घरातून वाजवून या सर्व लोकांचे आभार पंतप्रधानांनी प्रदर्शित करायला सांगितले होते. देशातील काही भागातील लोकांनी कर्फ्यूचे गांभीर्याने पालन केले नाही. उलट कर्फ्यूला थोडं कंटाळतच पाच वाजवले आणि आपली सामाजिक कृतज्ञता व्यक्त करायला सुरवात केली. यामध्ये काही जण ढोल-ताशा, फटाके घेऊन रस्त्यावर/चौकात पोहोचले. या सर्व गोष्टींचा अनुक्रम आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा अवघड परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या विरुद्ध लढायला पाहिजे. ही वेळ लिखाणातून चुका दाखवण्याची नाही. या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने घरी बसून आपले सहकार्य शासकीय यंत्रणांना दिले पाहिजे. तरीदेखील पंतप्रधानांच्या भाषणांनंतर काही प्रश्न सतत मनात घोळत राहतायत त्या संदर्भाने मी इथे उहापोह करणार आहे.
Explanation:
Answer:
जगाच्या प्रत्येक भागामध्ये खूप अंधश्रद्धा पसरलेली आहे त्याच्यामुळे आजपर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. अंधश्रद्धा हा लोकांच्या मनामध्ये रुजलेली आहे हे त्याचेच उदाहरण आपण करोना काळात देखील बघितले.
जगभरात करोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे जीवन हे विस्कळीत झालेले आहे. करोना च्या काळात वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी करोनाने रुद्र रूप धारण केलेले होते. लोक आता वाट बघू लागले आहेत हा आजार कधी जाणार .
करोना जाण्यासाठी लोकांनी काय नाही ते केले, जे लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही असे लोक सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडू लागले .
काही चर्चमध्ये असे जाहीर करण्यात आले की करोनाला संपवण्यासाठी येशू ख्रिस्तांचा धावा करावा लागेल. जिम्बॉम्बे मध्ये असे सांगण्यात आले की करोनाने तुम्ही मरणार नाहीत देवदूत तुमच्या पाठीशी आहे एक वेळेस करोना या जगातून नष्ट होईल पण लोकांच्या मनामध्ये असलेली अंधश्रद्धा व त्यांची त्याची मुळे काढणे खूप अवघड आहे.
अंधश्रद्धा लोकांच्या मनात घर करून बसते करुणा च्या काळात तर अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा फैलाव झाला. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की देशाला संपवण्यासाठी सैतानाने करोनाचा राक्षस पाठविला आहे. काही म्हणतात तरुणाच्या काळात मंदिरे चर्च मशिद बंद असल्यामुळे करोना का नाश होऊ शकत नाही. अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे आपण विज्ञान युगात जगत आहोत त्यामुळे अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणे व त्या सारखे वर्तन करणे योग्य नाही लोक जिथे एकत्र जमतात ही जागा म्हणजे मंदिरे मशिदी अशा ठिकाणी मरण आले तर त्यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही असा विश्वास आहे .
कोरोनाच्या काळात अजून एक अंधश्रद्धा पसरलेली ती म्हणजे करोना बरा करायचा असेल तर विषारी द्रव्य पदार्थ पिणे या गैरसमजुतीमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले.
काहींनी तर करोनाची करोना माता म्हणून पूजा केली. काही भागात करोना आईची वाजत गाजत मिरवणूक काढली. या सर्व गोष्टी बघून असे लक्षात येते की करोनाच्या काळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात पसरल्या. करोना मध्ये जीव कसा वाचेल यासाठी लोकांनी अंधश्रद्धेवर खूप मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला.