(अ) विक्रयकलेचे महत्त्व स्पष्ट करा.
Answers
Answer:
विक्रयकला : (सेल्समनशिप). ग्राहकाने वस्तू अथवा सेवा विकत घ्यावी, यासाठी त्याचे मन वळविण्याची कला म्हणजे विक्रयकला असे सामान्यपणे म्हणता येईल. वस्तू खरेदी करण्याची ग्राहकाची इच्छा अधिक तीव्र करणे व त्याचे हित वस्तू खरेदी करण्यातच सामावलेले आहे हे त्याला मनोमन पटवून देणे, हे या कलेचे उद्दिष्ट असते. या कलेमुळे संभाव्य ग्राहकाला एखाद्या वस्तूची गरज पटते व त्यातून पुढे ग्राहक व विक्रेता या दोघांनाही समाधान देणारा विक्री व्यवहार घडून येतो. औद्योगिक क्रांतीनंतरच्या कालखंडात उद्योगधंदे व उत्पादने, तसेच देशी व विदेशी बाजारपेठा यांची प्रचंड वाढ होत गेली व त्या क्षेत्रातील स्पर्धाही वाढली. आधुनिक विक्रयकलेचा उदय व विकास या परिस्थितीतून घडून आला. विक्रयकला ही कला आहे की शास्त्र, हा एक विवाद्य विषय आहे. विक्रयकलेसंबंधीचे ज्ञान सुयोग्य पद्धतीने, निरीक्षणपूर्वक अभ्यासाने, संशोधन व प्रयोग यांद्वारे संकलित व सुसूत्र करण्यात येते. यातूनच विक्रयकलेचे शास्त्रही निर्माण झाले.
विक्रेत्याला त्याची संघटना ज्या वस्तूंची विक्री करते त्या वस्तूंची उत्पाजनपद्धती, वितरणपद्धती व तो उद्योग यांसंबंधीची शास्त्रशुद्ध व परिपूर्ण माहिती असावी लागते. त्याचबरोबर ग्राहकांना प्रभावित करून त्यांचे मन वळविण्याची कलाही त्याला अवगत असावी लागते. विक्रयकलेतील यश हे बव्हंशी परिस्थितिसापेक्ष असते. एखाद्या विशिष्ट पद्धतीचा सरसकट वापर करून विक्रेता सर्वच ग्राहकांना आपली वस्तू अगर सेवा विकू शकेल असे नाही. विक्रयकलेसंबंधीचे प्रयोग नियंत्रित अशा परिस्थितीत करता येत नसल्यामुळे, त्यातून निश्चित असे अनुमान काढणे कठीण जाते. विक्रेत्याला नेहमीच ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो आणि त्यांची मने वळवून त्यांना आपला दृष्टिकोन पटवून द्यावा लागतो. विक्रयकलेचे यश हे विक्रेत्याने आत्मसात केलेली कौशल्ये व त्याची व्यक्तिगत गुणवैशिष्ट्ये यांवर अवलंबून असते. विक्रयकला आणि मानसशास्त्र, समाजशास्त्र व मानवशास्त्र या वर्तनवादी शास्त्रांचा निकटचा परस्परसंबंध आहे. निरनिराळ्या परिस्थितींत मानवी वर्तन कसे घडते हा मानसशास्त्राच्या अभ्यासाचा विषय असल्याने, विक्रेते व ग्राहक यांच्या परस्परांशी होणाऱ्या वर्तनाचाही अभ्यास मानसशास्त्राच्या आधारे होऊ शकतो.
Answer:
Step-by-step explanation: