आ. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना
धातु-गुणधर्म कमी होत जातो.
Answers
Answer:
भूरसायन शास्त्र : पृथ्वीचा व तिच्या घटकांचा रसायनशास्त्राच्या दृष्टीने केला जाणारा अभ्यास. या शास्त्रामध्ये पृथ्वीचे रासायनिक संघटन (रा. सं.) आणि त्यात झालेले व होत असणारे बदल यांचा अभ्यास समाविष्ट आहे. या शास्त्राची पुढील कार्ये आहेत : (१) पृथ्वीवरील मूलद्रव्यांची व त्यांच्या समस्थानिकांची (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांची) सापेक्ष विपुलता व प्रमाण (निरपेक्ष विपुलता) काढणे (२) पृथ्वीच्या विविध आवरणांच्या भागांतील (उदा., शिलावरणातील खनिजे, खडक तसेच विविध नैसर्गिक द्रव्ये यांतील) मूलद्रव्यांच्या स्थानपरत्वे व कालपरत्वे झालेल्या वाटणीचे स्पष्टीकरण देणे आणि (३) मूलद्रव्यांची सापेक्ष विपुलता व वाटणी वा स्थलांतर यांचे नियंत्रण करणारे नियम (तत्त्वे) शोधून काढणे. यांशिवाय पृथ्वीच्या रासायनिक उत्क्रांतीचा व समस्थानिकांच्या विश्वातील स्थैर्याचा अभ्यास आणि चंद्र व अशनी (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पोहोचलेले पृथ्वीबाहेरील पदार्थ, मिटिअराइट्स) यांतील मूलद्रव्यांचा अभ्यास केला जातो. यांसाठी खगोलीय पदार्थांच्या रासायनिक विश्लेषणासंबंधीची खगोल भौतिकीय माहिती आणि पृथ्वीच्या अंतरंगाच्या रा. सं. विषयीची भूभौतिकीय माहिती सहाय्यभूत ठरते.
पृथ्वीचे स्वरूप सर्वत्र एकसारखे नसल्याने पृथ्वी ही एक गुंतागुंतीची रासायनिक प्रणाली असून पृथ्वीमधील सर्व घडामोडींत मूलद्रव्यांचा सहभाग असतो. यांपैकी पुष्कळ घटनांमुळे मूलद्रव्ये व समस्थानिक यांची विशिष्ट प्रकारे पुनःवाटणी होते. भूरसायनशास्त्रीय अभ्यासातून या घटनांवर प्रकाश पडतो. एफ्. डब्ल्यू. क्लार्क यांच्या मते प्रत्येक खडक ही स्वतंत्र रासायनिक प्रणाली मानली पाहिजे. या प्रणालीत विविध प्रकारे बदल घडून येतात व त्यांमुळे नवीन प्रक्रिया घडून येऊन रासायनिक समतोल ढळतो व नंतर नव्या स्थितीत नवीन प्रणाला स्थिर होते. असे बदल होण्याची शक्यता, ते केव्हा व कसे होतात, त्यांच्यात घडण्याऱ्या प्रक्रिया आणि शेवटी त्यांच्या होणारा परिणाम यांचा अभ्यास या शास्त्रास येतो. भूरसायनशास्त्रातील बरीच माहिती तर्काधिष्ठित असते. उदा., पृथ्वीच्या अंतरंगाविषयीची अप्रत्यक्षपणे मिळालेली माहिती.
इतिहास : या शास्त्राचा विकास प्रामुख्याने १९३० नंतर झाला परंतु रसायनशास्त्रीय दृष्ट्या पृथ्वीचा अभ्यास करण्याची कल्पना तत्पूर्वीची आहे. सी. एफ्. शनबाइन (१७९९ – १८६८) यांनी ‘जिओकेमिस्ट्री’ (भूरसायनशास्त्र) ही संज्ञा १८३८ सालीच सुचविली होती आणि या शास्त्राच्या संशोधनासंबंधी आराखडा पण तयार केला होता. पृथ्वीतील मूलद्रव्यांच्या सापेक्ष विपुलतेसंबधी आणि भूरसायनशास्त्राची व्याप्ती निश्चित करण्याबाबत जे. डब्ल्यू. डबेरिनर (१७८० – १८४९), जे. जे. बर्झीलियस (१७७९ – १८४८), सी. जी. बिशोफ (१७९२ – १८७०), जे. एल्. रोट (१८१८ – ९२) वगैरे संशोधकांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. १८८४ नंतर अमेरिकेत या शास्त्राच्या अभ्यासाला सुरूवात झाली. १९०५ साली वॉशिंग्टन येथे कार्नेगी इन्स्टिटयूशनमध्ये भूभौतिकीय प्रयोगशाळा सुरू झाल्यावर नियंत्रित रासायनिक व भौतिक परिस्थितीमध्ये प्रयोग करता येऊ लागले. भौतिकीय रसायनशास्त्राचे भूवैज्ञानिक प्रक्रियांमधील कार्य स्पष्ट होऊ लागले व या शास्त्राच्या प्रगतीला नवीन दिशा मिळाली. या संस्थेतून प्रसिद्ध झालेले अनेक शास्त्रीय निबंध खूप मान्यता पावले. येथील एफ्. डब्ल्यू. क्लार्क, एच्. एस्. वॉशिंग्टन, पी. निग्ली इ. शास्त्रज्ञांनी भूरसायनशास्त्रास आकार दिला. याच सुमारास रशिया व नॉर्वे येथील संशोधकांनी या कार्यास हातभार लावला. स्फटिकातील अणूंची मांडणी क्ष-किरणांच्या बाबतीत ⇨ विवर्तन जालकाचे कार्य करते, या माक्स फोन लौए यांच्या १९१२ सालच्या शोधापासून प्रेरणा घेऊन व्ही. एम्. गोल्डश्मिट यांनी क्ष-किरण विश्लेषणाचा वापर करून स्फटिकांच्या भूरसायनशास्त्रीय अभ्यासाचे मोलाचे कार्य केले. स्फटिकांची संरचना आणि अणूंचे वा आयनांचे (विद्युत् भारित अणु, रेणू वा अणुगट यांचे) आकारमान यांचा परस्परसंबंध असतो, असा निष्कर्ष त्यांनी काढळा. हा रसायनशास्त्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोआणि म्हणूनचे गोल्डश्मिट यांना भूरसायनशास्त्राचे जनक मानले जाते. या शोधाच्या आधारे डब्ल्यू. एच्. व डब्ल्यू. एल्. ब्रॅग आणि इतर यांनी अनेक स्फटिकांच्या संरचना समजावून घेतल्या व स्फटिकी पदार्थातील मूलद्रव्यांच्या वाटणीचे ब्रॅग नियम सूत्रबद्ध केले. फ्रेडेरिक सॉडी (१८७७ – १९५६) यांनी १९१३ साली समस्थानिकांची कल्पना पुढे मांडली. किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) समस्थानिकांच्या वाटणीच्या आघारे खडकांचे आणि पर्यायाने पृथ्वीचे वय अचूकपणे काढता येऊ लागले. आधुनिक तंत्रामुळे भूरासायनिक निरीक्षणे प्रत्यक्ष घेणे शक्य झाले (उदा., रॉकेटांच्या साहाय्याने वातावरणाच्या वरील थरांचे रासायनिक संघटना कळू लागले). भूरासायनिक विश्लेषणाच्या नवीन पद्धतींमुळे वाढलेली अचूकता व ऊष्मागतिकीची तत्त्वे [⟶ ऊष्मागतिकी] वापरून खडकांतील प्रावस्थांच्या समतोलाचा [⟶ प्रावस्था नियम] अभ्यास प्रयोगशाळेत करता येऊ लागल्याने जमा झालेली माहिती हीसुद्धा भूरसायनशास्त्राच्या वाढीस उपकारक ठरून त्यामुळे धातुकांच्या (कच्च्या रूपातील धातूंच्या) विश्लेषणास विश्वसनीय आधार मिळाला. आद्य वातावरणात असतील अशा वायूंच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगांमध्ये मिथेन, अमोनिया व पाणी यांच्यापासून ⇨ ॲमिनो अम्ले व प्रथिने संश्लेषित झाली (घटक मूलद्रव्यांच्या संयोगाने तयार झाली) व त्यामुळे जीवांची रासायनिक उत्कांती (क्रमविकास) विशद करणाऱ्या सिद्धांताला पुष्टी मिळाली [⟶ जीवोत्पत्ति]. अनेक प्रकारे प्रयोग करून पाहिल्याने महासागरांची निर्मिती व उत्क्रांती यांविषयीची आणि पृथ्वीच्या अंतरंगविषयीची माहिती ताडून पाहता आली
please follow
Answer:
aa aavtrtamdye davekdun ujvekade Jaana datu Gundam kme hot jato