Geography, asked by darshannyahalde2004, 25 days ago

(आ) गंगा नदीचे खोरे आणि अॅमेझॉन नदीचे खोरे यांतील
मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा.​

Answers

Answered by tiwaripoonam9032
6

Answer:

Explanअॅमेझॉन नदी खोरे :

१. ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुववृत्ताजवळील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८° से असते.

२. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. जास्त पर्जन्य, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे.

३. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही.

४. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे.

गंगा नदीचे खोरे :

१. भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे.

२. गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात.

३. गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उद्योगांच्या विकासासाठी अनुकूल आहे. या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहे.

४. गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे.ation:

Answered by Adityanandavdekar
0

Answer:

1. भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे.

2. गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात.

3. गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उदयोगांच्या विकासासाठी अनुकूल आहे. या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे.

Similar questions