Math, asked by anu91016, 10 months ago

आ) जंगलातील हत्ती काय करायचे?​

Answers

Answered by vaishanavi2003
4

इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतात. याकरता हत्तीचे छोटे बछडे पकडून त्यांना लहानपणापासूनच शिक्षण द्यावे लागते. जंगलात लाकडे कापायच्या गिरणीत मोठमोठी झाडे कापून लाकडाचे ओंडके बनवतात. शिकवलेले हत्ती हे ओंडके सोंडेत धरून किंवा पायाने ढकलत ढकलत वाहून नेतात. वाहून आणलेले ओंडके ते नदीच्या पाण्यात टाकतात. मग ते ओंडके पाण्याबरोबर नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर किंवा प्रवाहाबरोबर खाली वाहत जातात. शिकवलेले हत्ती गाड्या ओढतात. पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठीसुद्धा होत असे. हत्तींवर बसून लढाया करत. हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधून त्यात बसून राजे-महाराजे आणि श्रीमंत लोक प्रवास करत. तसंच अंबारीतून मिरवणुका काढत. हत्तींना शिकवून सर्कशीत त्यांच्याकडून कामे करवून घेतात. ते सर्कसमध्ये अनेक प्रकारची कामे करतात. हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात. त्यांना ‘हस्तिदंत’ म्हणतात. हस्तिदंताना खूप मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिने ठेवण्याच्या पेटया, शोभेच्या वस्तू, पेपरवेट, फुलदाण्या, बांगडया, बटने इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून तयार करतात.

हत्ती जंगलात कळपाने राहतात. एकेका कळपात सात-आठपासून २०-२५ पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्याने दोन-तीन मोठ्या माद्या आणि बच्चे असतात. नर कळपात नसतात. कळपात जसे मध्यम वयाचे बच्चे असतात, तसे अगदी लहान बछडेदेखील असतात. कळपाचे नेतृत्व म्हाताऱ्या अनुभवी मादीकडे असते. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो. केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात. वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघेही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असे म्हणतात. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात. माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात. माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.हस्तिदंत.

Similar questions