(आ) कोणत्या काळी कळेना मी जगाया लागला
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा।
Answers
Answered by
4
Explanation:
रंगुनी रंगांत सार्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो,
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
Similar questions
Biology,
4 months ago
English,
4 months ago
India Languages,
9 months ago
French,
1 year ago
Social Sciences,
1 year ago