India Languages, asked by shaikhmanha744, 3 months ago

:
आ) खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा :
(६
१) भ्रमणध्वनी नसते तर ....!
मुददे ४ संपर्कात अडचणी - रोजच्या व्यवहारात व्यत्यय – उपयुक्तता – काळाची गरज -
तंत्रज्ञान- अतिरेकी वापराचे दुष्परिणाम – सृजनशील विचार व कृतींना मारक​

Answers

Answered by salimkhan83273
53

Explanation:

मित्रांनो आजच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या जिवनाचा एक महत्त्वचा भाग बनला आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. मोबाईल फोन मुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. आज आपल्याला मोबाईल फोन वापरून बरेच कामे करता येतात. असे कुठलेही काम नाही की ते आपण मोबाईल विना करू शकत नाही. आजच्या वेगवान युगात मोबाईल फोन ने खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित केले आहे. परंतु आपण कधी विचार केला आहे का, की मोबाईल फोन नसता तर काय झाले असते?

या युगामध्ये प्रत्येक वस्तूचे काहीना काही फायदे आणि नुकसान आहेत. म्हणुन त्यामुळे मोबाईल फोन नसता तर काही गोष्टींसाठी फायदा झाला असता आणि काही गोष्टींसाठी नुकसान झाले असते.

आजच्या या युगाला आधुनिक युगामध्ये परिवर्तित करण्यासाठी मोबाईल फोनची भूमिका हि खुप मोठी आहे. त्यामुळे मोबाईल फोन नसता तर हे आजचे युग आधुनिक झाले नसते. तसेच या युगाला डिजिटल करण्यामागे सुद्धा मोबाईल फोन चे खूप मोठे योगदान आहे.

मोबाईल नसता तर आजचे युग जे आधुनिक डिजिटल झाले आहे ते झाले नसते. खूप सार्‍या गोष्टी अवघड होतील. आईवडिलांपासून दूरवर असलेल्या मुलांना आपल्या आईवडिलांशी संपर्क साधता येणार नाही. बँकेचे व्यवहार करण्यासाठी बॅंकेच्या बाहेर दूरवर रांगेत उभे राहावे लागेल. डॉक्टरांशी संपर्क न झाल्यामुळे अनेकांचे प्राण जातील. आपल्याला कुठे जायचे असेल तर आपल्याला प्रत्येक जागी मार्ग लोकांना विचारावे लागतील. बरेच विद्यार्थी इंटरनेटचा वापर करून मोबाईल वरुन शिक्षण घेत होते ते आता मोबाईल नसल्यामुळे बंद होईल. ऑनलाईन शॉपिंग करता येणार नाही. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पत्रव्यवहाराचा उपयोग करावा लागेल त्यामुळे पत्रविभागात अधिक प्रमाणात काम वाढेल. आपल्या परिवारातील एखादी व्यक्ति घराच्या बाहेर गेलेली असेल तर त्या व्यक्तीचा ठावठिकाणा कसा शोधता येईल? आपल्याला एखादी माहिती हवी असेल तर ती माहिती सहज शक्य होणार नाही म्हणजेच सांगायचे झाले तर प्रत्येकजागी आपला वेळ जाईल आणि अडथळा निर्माण होईल. सांगायचे तात्पर्य येवढेच की, मोबाईल नसता तर ह्या सर्व गोष्टी शक्य झाल्या नसत्या.

मोबाईल बंद झाले तर खूप काही गोष्टी चांगल्या घडतील...

मोबाईल नसल्यामुळे लोकांकडे वेळ निर्माण होईल त्यामुळे लोकं त्यांचा परिवारातील लोकांशी चर्चा करतील, बोलतील, वेळ घालवतील. लहान मुले जे रात्री झोपेच्या वेळी मोबाईल मध्ये कार्टून व्हिडिओ पाहून झोपत होते ते आता आजीबाईंच्या गोष्टी ऐकून झोपतील. मोबाईल मुळे जे मुलं घरी मोबाईलवर वेळ घालवत होते ते आता मोबाईल नसल्यामुळे बाहेर मैदानावर खेळतील. जे लोकं सोशल साइटवर व्यस्त राहत होते ते आता एकमेकांशी भेटतील. काही लोकं वाहन चालवत असताना मोबाईल वापरायचे किंवा मोबाईलवर बोलायचे ते आता कमी होईल आणि यामुळे अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल बर्‍याचदा अपघात हा दारू पिऊन वाहन चालविल्याने किंवा मोबाईल वापरत असल्याने होतो. आपण एकदिवस मोबाईल फोन शिवाय राहू शकत नाही. एकवेळ आपल्याला जेवायला नाही मिळाले तरी चालेल पण आपल्याला मोबाईल फोन जवळ हवा अशी परिस्थीती या काळात बनली आहे. त्यामुळे मोबाईल नसेल तर नक्कीच लोकांचे आरोग्य देखील चांगले होईल.

मित्रांनो मोबाईल मुळे चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतच राहतील. पण हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की आपण मोबाईलचा वापर कशाप्रकारे करत आहोत.

please mark my answer as brainliest and also thanks my some of the answer

have a great day:)

Similar questions