India Languages, asked by mayurshiv21, 3 months ago

आ. पुढील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं​

Answers

Answered by onkarborhade25
3

12:43 PM

Ki C66

'आश्वासक चित्र' या कवयित्री नीरजा यांच्या कवितेत स्त्री-पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटले आहे. ते भविष्यात प्रत्यक्ष साकार होईल असा विचार येथे मांडला आहे. भातुकली व चेंडू हे खेळ स्त्री पुरुषांच्या पारंपरिक कामांचे प्रतिनिधित्व करतात. भविष्यात त्यांनी एकमेकांच्या पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडावे असे कवयित्रीला वाटते. स्त्री-पुरुषांनी समानतेचे जीवन स्वीकारावे, परस्पर सामंजस्य व सहकार्याने जीवन जगावे असा सकारात्मक संदेश

कवयित्री या कवितेतून देऊ पाहते. कवयित्री येथे सकारात्मक चित्र साकार करत म्हणते, की आपले कौशल्य दाखवता दाखवता तापलेल्या उन्हात आडोशाला सावलीमध्ये बसून तो मुलगा हळूहळू घर सांभाळायलाही शिकेल. भूतकाळातील असमानतेची दरी भविष्यकाळात नष्ट होऊन स्त्री पुरुष समानता निर्माण होईल असे कवयित्रीचे म्हणणे आहे.

कवितेतील आशय मुक्तपणे मांडण्यासाठी कवयित्रीने येथे मुक्तछंद वापरला आहे. त्यामुळे, कवयित्री कवितेतील वास्तव थेटपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरते. कवितेची साधी,

संवादात्मक भाषाशैली चिंतनशील विचार सहज

मांडून जाते.

Similar questions