आ
पत्र लिहा.
पाच दिवसाच्या सुटीसाही वर्ग शिक्षकांना विनंती फालिहा.
१मुझे लेटर लिखना है
Answers
Answer:
दिनांक २५. १०. २०२०
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,
लातुर -४२१२०५
विषय- आईची तब्येत बरी नसल्या कारणाने सुट्टी, रजा मिळण्याबाबत विनंती पत्र
माननीय महोदय,
मी आदित्य माने आपल्या शाळेत इयत्ता ७वी–अ मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. माझ्या आईची तब्येत गेल्या दोन दिवसांपासून खालावली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला आणखी पुढील चार दिवस विश्रांतीची खुप गरज आहे.
मी अशी विनंती करतो कि दि. २६.१०.२०२० ते ३०.१०.२०२० अशी ५ दिवसांसाठी तुम्ही माझी रजा, सुट्टी मंजूर करावी, जेणेकरुन मी माझ्या आईच्या तब्येतीची पुरेपुर काळजी घेऊ शकेन. आईच्या तब्येतीत सुधारणा होताच मी पुन्हा शाळेत नेहमीप्रमाणे न चुकता येईन. मी या दिवसांतील माझा राहिलेला अभ्यास जबाबदारीने पूर्ण करेन.
आपणास नम्र विनंती आहे की तुम्ही मला रजेसाठी मंजूरी द्यावी.
धन्यवाद!
आपला आज्ञाधारी,
आदित्य माने
इयत्ता ७वी–अ
दिनांक २५. १०. २०२०