(आ) शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Answers
फार लहान वयातच शिरीषवर मोठे आभाळ कोसळले. खेळण्याच्या वयात तो एका जवाबदार माणसासारखा वागत होता.
फक्त वडिलांच्या आनंदासाठी तो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी गाणं शिकायला गेला.
नाना गेल्यावरही त्याने त्यांचे अस्तित्व जिवंत ठेवले.
यावरून आपल्याला असं शिकायला मिळाले की फक्त स्वतःसाठी जीवन जगण्यापेक्षा दुसऱ्यांच्या आनंदासाठी एखाद्यावेळी काहीतरी मदत करायची संधी भेटली तर पुढेमागे न बघता निःस्वार्थ भावनेने मदत केली पाहिजे.
Answer:
शिरीषच्या वडिलांचा संगीत कलेवर खूप प्रेम होते. परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले. बहिरेपणामुळे त्यांची संगीतसेवा अंतरली. त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत राहून त्याने त्यांची सेवा केली. वडिलांच्या निधनानंतरही लोकनिंदेची पर्वा न करता, त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठले. शिरीषच्या या गंभीर भूमिकेतून आपल्याला असा संदेश मिळतो की, आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे.