(आ) शायिस्ताखानाने पुण्यात.... मुक्काम
ठोकला.
(शनिवारवाड्यात, लाल महालात, पर्वतीवर)
Answers
Answer:
लाल महालात.
Step-by-step explanation:
लाल महाल ही छोटीशी वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे. लाल महालच्या समोरच पुण्यातील अतिशय गजबजलेला असा शिवाजी रोड आहे.
शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालातच गेले.शिवाजीच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. " सिवाजी तो चूहा है, खाविंद मै ऐसे पकडके लाऊंगा सिवाजी को..!" असे शाहिस्तेखान औरंगजेबास म्हणाला होता. शाहिस्तेखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लालमहाल. तोपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यातून सुखरूप सुटून रायगडावर पोहचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत आहे. दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन शिवाजी महाराजांना चेतावणी देत होता. त्याने ओळखले होते की शिवाजीचे प्राण हे त्याच्या प्रजेत असून तो त्याच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचा नाही. दरम्यान शिवरायानी शाहिस्तेखानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक ४०० विश्वासू मावळ्यांना घेऊन लालमहालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्तेखानची धांदल उडाली. या लढाईत शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली. तसेच या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा मारला गेला आणि त्याच्या बेगमा मृत्युमुखी पडल्या. याचा शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पुणे व लालमहाल मुक्त केला. आज या घटनेला ३५० वर्षे होत आहेत. इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम शिवाजी महाराजांनी या लालमहालात केला याची साक्ष होऊन ही वास्तू अभिमानाने उभी आहे. या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात अग्रक्रमाने येते कारण एक लाख सैन्य असताना अवघ्या ४०० मावळ्यांना घेऊन विजय संपादन करणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही. या प्रकाराने औरंगजेबाला आश्चर्यमिश्रित धक्का बसला. राजमाता जिजाऊसाहेब यांनी बांधलेला लालमहाल. सध्या अस्तित्वात नाही. त्या जागी सध्याची लालमहालाची प्रतिकृती पुणे महापालिकेने बांधली आहे.