आ) तुमच्यातील प्रत्येक तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
Answers
Answer:
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""उत्तमलक्षण"" या काव्यातील आहे. श्रीदासबोधातील या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम, गुणसंपन्न, आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहे. व्यक्तीने जीवनात कसे वागावे याचे उत्तम मार्गदर्शन यात केले आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने समृद्ध करणारा हा पद्यपाठ आहे.
★(अ)संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी
(१) अपकीर्ती सांडावी.
(२) सतकीर्ती वाढवावी.
(३) सत्याची वाट दृढ धरावी.
★(आ) कधीही करू नयेत अशा गोष्टी.
(१) पुण्यमार्ग सोडू नये.
(२) असत्याचा अभिमान बाळगू नये.
(३) पैंज किंवा होड लावू नये.
(४) कुणावरही आपले ओझे लादू नये.
★(इ) तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
● गुण
(१) मी नियमित सूर्यनमस्कार घालतो.
(२) मी नेहमी सत्य बोलतो.
(३) थोरामोठ्यांचा सन्मान करतो.
● दोष
(१) मला लवकर आळस येतो.
(२) माझे अक्षर चांगले नाही.
(३) मला पटकन राग येतो.
धन्यवाद..."
see the above attachment
hope it helps you