आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चार पाच वाक्यांत लिहा.
Answers
Answer:
आंतरजाल म्हणजे इंटरनेट
Explanation:
1
शिवानी कटारिया (२७ सप्टेंबर, १९९७:गुडगांव, भारत - ) ही एक भारतीय जलतरणपटू आहे. हीने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
जन्मदिनांक
२७ सप्टेंबर, १९९७ (वय: २३)
जन्मस्थान
गुडगांव, भारत
2
कांचनमाला विनोद पांडे-देशमुख (जन्म:३१ डिसेंबर १९९०) (पूर्वाश्रमीची कांचनमाला ज्ञानेश्वर पांडे) ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची भारतीय जलतरणपटू आहे. तिचे वडील ज्ञानेश्वर पांडे हे हॉकीपटू आहेत. कांचनमाला आंधळी आहे, पण अंधत्वामुळे आलेल्या मर्यादा झुगारून तिने जिद्दीने वयाच्या १० व्या वर्षांपासून पोहायला सुरुवात केली. ती केवळ ८ दिवसात पोहणे शिकली व तिने खुल्या गटात भाग घेऊन आपली गुणवत्ता दाखविली. वयाच्या ११वे वर्षी तिने सात किमी समुद्री अंतर १४ मिनिटात पार करून लिम्का बुकमध्ये नाव नोंदविले. [१]तिने मेक्सिको येथे झालेल्या पॅरा जागतिक जलतरणस्पर्धेत, तिच्या गटात सुवर्णपदक जिंकले. तिने हे सुवर्णपदक २०० मीटर वैयक्तिक मिडले गटात राहून मिळविले.[२][३]ती नेत्रहीन आहे.[४][५] कांचनमाला भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एकलारा येथे राहते.
3
बुला चौधरी (जन्म-२ जानेवारी १९७०,हुगली,भारत) हि माजी भारतीय राष्ट्रीय महिला जलतरणपटू आहे.ती एक अर्जुन पुरस्काराचा मानकरी आहे आणि तसेच पद्मश्री पुरस्कार विजेता आहे.२००६ ते २०११ पर्यंत पश्चिम बंगालमध्ये भारताचे आमदार म्हणून काम केले.[१]
4
शिखा टंडन (जन्म-२० जानेवारी १९८५)त्या एक बेंगळुरू मधील स्विमिंग चॅम्पियन आहे. टंडन यांनी राष्ट्रीय स्तरावरील १४६ पदके आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ३६ पदके मिळविली आहेत. ज्यात पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. सध्या त्या अमेरिकेच्या विज्ञान संघाचे सदस्य आहेत.जे यूएसएडीएच्या वैज्ञानिक पुढायांसाठी महत्त्वाचे असलेले संसाधन, अहवाल आणि प्रकल्पांची दैनंदिन कामकाजाची प्रगती, विकास व देखभाल करीत आहे.[१]
5
वीरधवल खाडे (२९ ऑगस्ट, १९९१) हा ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेणारा एक मराठी जलतरणपटू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तो पहिल्यांदा ऑलिंपिकसाठी निवडला गेला. त्यावेळी तो वयाने सर्वात लहान जलतरणपटू होता.
खाडेचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले. न्यू मॉडेल कॉलेज येथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले.