Environmental Sciences, asked by letnee8191, 9 months ago

आंतरराष्ट्रीय दशतवादी हल्ल्यांची उदाहरणे लिहा

Answers

Answered by loknadamjinaga1044
2

Answer:

सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले अल कायदा ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींत घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय पेंटॅगॉन मध्ये घुसवले गेले व चौथे विमान पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकुण २,९७४ बळी गेले.

न्यूयॉर्क शहरातील वर्ड ट्रेड सेंटर इमारतींना लागलेली आग

ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरु केलेल्या युद्धात झाली.

Similar questions