आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या
अनुषंगानेच का विचारात घेतली जाते?
Answers
Answer:
१८०० रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा. १८०० रेखावृत्त पॅसिफिक महासागरातून जाते; ते ज्या ज्या ठिकाणी जमिनीवरून जाते ती ठिकाणे टाळून, सर्वस्वी समुद्रावरून आणि होता होई तो १८०० रेखावृत्ताच्या अनुरोधाने जाणारी, अशी ही रेषा मानलेली आहे. तिच्या पूर्वेला उत्तर व दक्षिण अमेरिका तर पश्चिमेला आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे प्रदेश येतात. ही रेषा ओलांडून जाताना वाराचा बदल करण्याची प्रथा आहे.
पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून अमेरिकेकडे जाताना ही रेषा ओलांडली, तर चालू असेल त्याच्या मागचा वार धरतात आणि पश्चिमेकडे, अमेरिकेकडून आशियाकडे किंवा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडकडे जाताना पुढचा वार धरतात. जहाजातून किंवा विमानातून एका बाजूच्या देशाकडून दुसऱ्या बाजूच्या देशाकडे जाताना वाराचा हा बदल करतात. या रेषेला ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ असे म्हणतात.
आंतरराष्ट्रीय वाररेषा भूभागावरून गेली असती, तर या भागातील रेषेच्या पश्चिमेकडे एक वार व तारीख, तर पूर्वेकडे त्याच्या मागची तारीख व वार अशी परिस्थिती उद्भवली असते. शिवाय ही रेषा काल्पनिक रेषा असल्याने भूभागावर ती नक्की केव्हा ओलांडली व तेथे नक्की कोणता वार व तारीख चालू आहे हे समजणे फार कठीण गेले असते. हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्याही भूभागावरून न नेता ती पूर्णपणे समुद्रावरून गेली आहे.