आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी
विचारात घेतल्या आहेत?
Answers
Answer:
This will help you out
Explanation:
१८०० रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा. १८०० रेखावृत्त पॅसिफिक महासागरातून जाते; ते ज्या ज्या ठिकाणी जमिनीवरून जाते ती ठिकाणे टाळून, सर्वस्वी समुद्रावरून आणि होता होई तो १८०० रेखावृत्ताच्या अनुरोधाने जाणारी, अशी ही रेषा मानलेली आहे. तिच्या पूर्वेला उत्तर व दक्षिण अमेरिका तर पश्चिमेला आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे प्रदेश येतात. ही रेषा ओलांडून जाताना वाराचा बदल करण्याची प्रथा आहे.
पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून अमेरिकेकडे जाताना ही रेषा ओलांडली, तर चालू असेल त्याच्या मागचा वार धरतात आणि पश्चिमेकडे, अमेरिकेकडून आशियाकडे किंवा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडकडे जाताना पुढचा वार धरतात. जहाजातून किंवा विमानातून एका बाजूच्या देशाकडून दुसऱ्या बाजूच्या देशाकडे जाताना वाराचा हा बदल करतात. या रेषेला ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ असे म्हणतात.
मॅगेलन हा पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला खलाशी. तो १५१९ मध्ये आपल्या तीन जहाजांसह स्पेनहून निघून पृथ्वीभोवती पश्चिम दिशेनेच जात राहिला. वाटेत तो मृत्यू पावला. त्याचे काही खलाशी व दोन जहाजेही नष्ट झाली. उरलेले एक जहाज व काही खलाशी सु. तीन वर्षानी पुन: स्वदेशी पोचले; तेव्हा स्पेनमध्ये गुरुवार तारीख ७ सप्टेंबर होती. परंतु जहाजावरील खलाशांच्या हिशेबाने तो दिवस बुधवार ता. ६ सप्टेंबरचा होता. त्यांनी पश्चिमेकडे जाताना सूर्यावरून कालमापन केले होते आणि एकंदरीत ३६०० पश्चिमेकडे गेल्यानंतर त्यांच्या कालगणनेत एका दिवसाचा फरक पडला होता. ती एक दिवस मागे पडली होती. त्यांना मग स्पेनमधील कालगणनेशी आपली कालगणना जुळती करून घेण्यासाठी बुधवार ६ सप्टेंबरऐवजी गुरुवार ७ सप्टेंबर ही तारीख व वार धरावा लागला.
कोणत्याही एका ठिकाणाहून पाहता पूर्वेकडील ठिकाणांची स्थानिक वेळ पुढे, तर पश्चिमेकडील ठिकाणांची स्थानिक वेळ मागे असते. ज्या ठिकाणाच्या रेखांशात १५० फरक असेल त्यांच्या स्थानिक वेळांत एक तास फरक पडतो. समजा, एका मूळ ठिकाणाहून पूर्वेकडील ठिकाणे लक्षात घेतली आणि दर १५०रेखांशावर घड्याळ एक एक तास पुढे असते हे मनात आणले, तर कोणत्या तरी एका ठिकाणी त्यावेळी रात्रीचे बारा वाजलेले असणार. त्याच्याही पूर्वेकडील ठिकाणी रात्री बारानंतरची वेळ असणार. पण ती कोणत्या बाराची? आता पश्चिमेकडील ठिकाणे लक्षात घेतली तर दर १५० रेखांशास घड्याळे एक एक तास मागे असणार.
आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील नवीन वार व तारीख सुरू होते. या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो. १८०° रेखावृत्ताची रेषा काही देशांत जमिनीवरूनही जाते. त्यामुळे हीच रेषा जर आंतरराष्ट्रीय वाररेषा धरली असती तर एकाच देशात किंवा प्रदेशात दोन वेगळे वार व तारखा असा गोंधळ झाला असता.त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताला अनुसरून आखताना ती रेषा पूर्णतः समुद्रावरून जावी ही प्रमुख बाब विचारात घेतली गेली. त्याचप्रमाणे एकाच देशाचा बेटांचा समूह हासुद्धा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या एकाच बाजूस असावा ही बाबही विचारात घेतली गेली. त्यामुळेच १८०° रेखावृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना काही प्रसंगी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे वळवण्यात आली आहे.