आ) दिवाळीत तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एका पदार्थांची कृति आईच्या मदतीने लिहा
Answers
Answer:
Sorry this question is very hard.
Explanation:
Answer:
मला दिवाळीत चकली खाण्यास खूप आवडते.
कृती-
4 कप तांदूळ
1 कप हरभरा डाळ
1/2 कप उडीद डाळ
1/2 कप मुगडाळ
1/2 कप साबुदाणा
1/2 कप धने
1 कप पोहे
2 टेबलस्पून जीरे
2 टेबलस्पून ओवा
1/4 कप लाल तिखट
1 टेबलस्पून हळद
चवीनुसार मीठ
1 कप गरम तेलाचे मोहन
1/4 कप पांढरे तीळ
तळण्यासाठी तेल
गरजेनुसार कोमट पाणी
पायर्या
प्रथम तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, साबुदाणा,धने, पोहे, जीरे आणि ओवा कढईत सर्व वेगवेगळे लालसर भाजून घ्यावे. ते भाजून झाल्यावर, ते गार झाल्यावर गिरणीतून बारीक दळून आणावे.
दळून आणलेले चकलीच्या भाजणीचे पीठ एका परातीत घेऊन त्यात लाल तिखट, हळद, गरम तेलाचे मोहन, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ घालून ते कोमट पाण्यात कणके सारखे भिजवून घेणे.
आता ते चकली करायचा सोऱ्यात घालून त्याच्या एका कागदावर किंवा एका डिशमध्ये चकल्या पाडून घेणे. कढईत तळण्यासाठी तेल गरम करून त्यात पाडलेल्या चकल्या तळून घ्याव्या. चकल्या मंद आचेवर लालसर तळव्या. चकल्या तयार आहेत.