आभाळाकडे डोळे लावने
Answers
Answer:
डोळे लावूनी आभाळाकडे किती पाहू रे तूझी वाट
आतातरी ये अन वाहू दे माझ्या शेतात पाण्याचा पाट
आभाळी दिसेना एकही ढग शेताची बघ लागेल वाट
कसे कुणा सांगू भीतीने किती तट तट होतंय पोटात
घेतले व्याजी बी बियाणे पण कसा घालू पेरणीचा घाट
पाणी ना त्या विहिरीतही भेगाळली जमीन झाली ताठ
रूजणार कसे बियाणे पावसा का फिरवली अशी पाठ
तूच अमुचा अन्नदाता तुझ्याविना कशी लागेल ददात
मूल बाळं ती उपाशी गुरांचीही पोटाला लागली पाठ
सरकार दरबारी फिरलो पण ह्या नशिबाने केला घात
मृग नक्षत्र गेले कोरडे गेला कोरडा अवघा आषाढ मास
श्रावणात तर आशाच सोडली भादव्यात तर नकोच आस
शेतकरी राजाची नाही राहीली काहीच या देशात शान
उपाय ना अंमलबजावणी कसली, फुका घोषणांचा बाण
मातीतून रूजे ना एकही बियाणं कसे पूरवू देशाला अन्न,
ढेकळ झालेली सुकी जमीन पाहून माझं डोकं झालंय सुन्न
बैलपोळा कसला आता विसरावे लागले सगळेच सणवार
भुकेने कासावीस जीवांना पाहून जीव हा तुटतो वारंवार
देवास त्या विनवितो जाऊनी परत नको शेतकऱ्याचा जन्म
नको पाहणे ते दुःख कुटुंबाचे तीळ तीळ अन्नासाठी आजन्म
रूजले जरी धान्य, येतोस ऐन वेळी नसता काही आसभास
सोन्यामोत्याचीे कणसं मातीमोल धुळीस शेवटचीही आस
कसे अवचित येऊनया तार तार करतोस माझी सगळी स्वप्न
कर्ज फेडण्या व्याकूळ मी, तू घेऊन जातोस तोंडातलही अन्न
बसलो आहे गुढग्यात खूपसून विचाराने भंगलेले सुन्नं डोकं
किती त्रास सहन करावा तुझ्याच आशेवर जगत होतं घरटं
आता एकच उपाय द्यावा हा जीव लावूनी गळ्याला मी फास
नाहीतर विष प्राशन करून संपवावा सगळ्याच जीवांचा त्रास
लाचार नको जगणे ते, हात पसरून थकलो आहे आता भारी
कर्जही माफ होईल थोडे, खाणारा एक जीव तरी होईल कमी
सोडून जातो पाठीमागे बायको मुले गुरं ढोर बिचारी बापुडी
दया दाखवून शासन देईल रक्कम मदत म्हणून तरी थोडी
Shetakari peranisathi abhalakade dole laun basala
Hope you understood