Environmental Sciences, asked by DheerajMehlawat3384, 1 year ago

Aabhar pradarshan in Marathi

Answers

Answered by sanika1235
1

Explanation:

प्रस्तावना: प्रस्तावनेमध्ये तुम्ही तुमच्या संघटनेचे आभार मांडता कारण त्यांनी तुम्हाला हे आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली, त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला की तुम्ही कार्यक्रमाची व्यवस्थित सांगता करू शकता. तुम्ही त्यांचे धन्यवाद करणे आवश्यक असते.

अतिथी आणि सहभागींचे आभार प्रदर्शन: या भागात, सहभागी झालेल्या सर्व प्रतिस्पर्धी, अतिथी, प्रतिनिधी यांचे आभार माना. त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी वेळ उपलब्ध करून दिला, त्यांनी त्यांच्या मौल्यवान सूचना दिल्या, मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचे आभार प्रदर्शन करावे. इथे तुम्ही फक्त सकारात्मक गोष्टींचा उल्लेख करावा. जरा एखादा भाग तुम्हाला खूप जास्त आवडला असेल तर त्याबद्दल थोडे कौतुक केले तरीही चालेल.

आयोजन समिती आणि स्वयंसेवक टीम चे धन्यवाद: आपली आयोजन समिती आणि विशेषत: स्वयंसेवकांना धन्यवाद देण्यास विसरू नका. एका व्यक्तीद्वारे कोणत्याही इव्हेंटचे आयोजन करता येत नाही, त्यासाठी वेगवेगळ्या टीम्स आवश्यक असतात. आपण त्यांचे आभार मानले पाहिजे.

प्रायोजक / Sponsors: तुमच्या कार्यक्रमाचे आर्थिक प्रायोजक तुम्हाला इव्हेंट्स साठी पैसे पुरवतात. तसेच मीडिया, एंटरटेन्मेंट, कम्युनिकेशन, फूड्स अँड बेव्हरेजेस आदी प्रायोजक आपल्याला सुविधा, प्लॅटफॉर्म्स पुरवितात. त्यांचे ही आभार प्रदर्शन करा.

ष्कर्ष / Conclusion: अखेरीस परत एकदा सर्वांचे धन्यवाद माना आणि कार्यक्रमाची सांगता करा. आभार कार्यक्रम शक्यतो सगळ्यात शेवटचा असतो, जर इव्हेंट्स नंतरच्या प्रवासाची, खाण्या-पिण्याची सोय असेल तर त्याची सूचना ही द्यावी.

hope it helps you

Similar questions