aabhar pradarshan speech in marathi
Answers
आमच्या विद्यापीठाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दिवस आहे, आज आम्ही भारतातील सर्वात मोठय़ा शिक्षण परिषदेचे आयोजन केले आहे. २०० प्रतिनिधी आणि ५०० सहभागी महाविद्यालये आणि शिक्षण क्षेत्रातील महावीरांनी आपली उपस्थिती नोंदवली. आमच्या विद्यापीठासाठी ही एक गौरवाची गोष्ट आहे.
युनिव्हर्सिटी एज्युकेशन कौन्सिलच्या वतीने आणि माझ्या स्वत: च्या वतीने मी आमचे प्रमुख पाहुणे केंद्रीय शिक्षण मंत्री श्री शर्माजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच बरोबर येथे उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय प्रतिनिधींचा मी आभारी आहे.
आम्हाला आणि आमच्या सहकारी विद्यापीठांना या परिषदेचा खूपच फायदा होणार आहे, तुम्ही दिलेले मार्गदर्शन, सल्ले आम्ही लवकरात लवकर कार्यान्वयीत करू याची आम्ही हमी देतो. मला माननीय श्री शर्मा यांचे भाषण खूप आवडले, त्यांनी डिजिटल शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. ज्या पद्धतीने त्यांनी विषय समजावून दिला ते कौतुकास्पद आहे.
मी या कार्यक्रमाची आयोजन समिती, शिक्षक आणि स्टाफ सदस्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. मी स्वयंसेवक आणि विद्यार्थी संघाचेही आभार मानतो. मी आमच्या वाहतूक आणि निवास टीम्स चे ही आभार मानू इच्छितो; आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय का कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता.
मी आमच्या डिजिटल पार्टनर एक्सवायझेड सोल्यूशन्स, रेडिओ पार्टनर ९३.५ , हॉस्पिटॅलिटी पार्टनर ब्रिजेश हॉटेल, न्यूज पार्टनर जनता न्यूज यांचे आभार मानू इच्छितो.
शेवटी, मी केंद्रीय शिक्षण मंत्री, प्रतिष्ठित प्रतिनिधी, सहभागी महाविद्यालये आणि विद्यापीठ प्राध्यापक यांचे आभार व्यक्त करून या परिषदेची सांगता करतो; हा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
विशेष सूचना: सर्व पाहुण्यांच्या प्रवासाची आणि नाश्त्याची व्यवस्था हॉटेल ब्रिजेश मध्ये करण्यात आली आहे. कृपया आपण असेम्ब्ली एरिया मध्ये जमावे. धन्यवाद.
hope it helps u mate....
pls mark me brainliest
Answer:
आभार प्रदर्शन आराखडा (Vote of Thanks Speech Format)
प्रस्तावना: प्रस्तावनेमध्ये तुम्ही तुमच्या संघटनेचे आभार मांडता कारण त्यांनी तुम्हाला हे आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली, त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला की तुम्ही कार्यक्रमाची व्यवस्थित सांगता करू शकता. तुम्ही त्यांचे धन्यवाद करणे आवश्यक असते.
अतिथी आणि सहभागींचे आभार प्रदर्शन: या भागात, सहभागी झालेल्या सर्व प्रतिस्पर्धी, अतिथी, प्रतिनिधी यांचे आभार माना. त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी वेळ उपलब्ध करून दिला, त्यांनी त्यांच्या मौल्यवान सूचना दिल्या, मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचे आभार प्रदर्शन करावे. इथे तुम्ही फक्त सकारात्मक गोष्टींचा उल्लेख करावा. जरा एखादा भाग तुम्हाला खूप जास्त आवडला असेल तर त्याबद्दल थोडे कौतुक केले तरीही चालेल.
आयोजन समिती आणि स्वयंसेवक टीम चे धन्यवाद: आपली आयोजन समिती आणि विशेषत: स्वयंसेवकांना धन्यवाद देण्यास विसरू नका. एका व्यक्तीद्वारे कोणत्याही इव्हेंटचे आयोजन करता येत नाही, त्यासाठी वेगवेगळ्या टीम्स आवश्यक असतात. आपण त्यांचे आभार मानले पाहिजे.
प्रायोजक / Sponsors: तुमच्या कार्यक्रमाचे आर्थिक प्रायोजक तुम्हाला इव्हेंट्स साठी पैसे पुरवतात. तसेच मीडिया, एंटरटेन्मेंट, कम्युनिकेशन, फूड्स अँड बेव्हरेजेस आदी प्रायोजक आपल्याला सुविधा, प्लॅटफॉर्म्स पुरवितात. त्यांचे ही आभार प्रदर्शन करा.
निष्कर्ष / Conclusion: अखेरीस परत एकदा सर्वांचे धन्यवाद माना आणि कार्यक्रमाची सांगता करा. आभार कार्यक्रम शक्यतो सगळ्यात शेवटचा असतो, जर इव्हेंट्स नंतरच्या प्रवासाची, खाण्या-पिण्याची सोय असेल तर त्याची सूचना ही द्यावी.
Explanation: