आचारसंहिता निवडणुकीपूर्वी किती दिवस आधी व किती दिवस नंतरपर्यंत चालू असते?
Answers
Answered by
2
निवडनुकांची तारीख सांगण्यापासून ते राजकारभार सुरळीत चाले पर्यंत.
Answered by
0
- निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीचे वेळापत्रक जाहिर झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात येेते आणि निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहते.
- मंत्री, त्याच्या शासकीय भेटीची निवडणूक प्रचार कार्याशी सांगड घालू शकत नाही आणि निवडणूक प्रचार कार्या दरम्यान शासकीय यंत्रणेचा किंवा कर्मचारी वर्गाचा सुद्धा वापर करु शकत नाही.
- कोणताही पक्ष किंवा उमेदवार त्याच्या हितसंबंधाला मदत व्हावी म्हणून सरकारी विमाने, वाहने इत्यादींसह कोणत्याही परिवहनाचा वापर करणार नाही.
- निवडणूक घेण्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधीत असलेले सर्व अधिकारी/कर्मचारी यांची बदली किंवा नियुक्त करण्यावर संपूर्णपणे बंदी असेल. जर एखाद्या अधिकाऱ्याची कोणतीही बदली किंवा नियुक्ती करण्याची आवश्यकता असेल तर आयोगाची पूर्व मान्यता मिळवणे आवश्यक असेल.
Similar questions