आफ्रिकेत कोणता मानव सापडला?
Answers
Answer:
sorry' I can't understand
आफ्रिका: क्षेत्रफळाने आशियाच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड. बेटांसह क्षेत्रफळ ३,०२,७७,१३५ चौ. किमी. उत्तरेस केप ब्लँक (३७०२१’उ.) ते दक्षिणेस केप अगुल्हास (३४०५१’ द.) दक्षिणोत्तर लांबी सु. ८,००० किमी. पश्चिमेस केप व्हर्द (१७०३२’ प.) ते पूर्वेस केप गार्डाफुई (५१०२५’). पूर्वपश्चिम विस्तार सु. ७,४०० किमी. किनारा सु. ३६,८८८ किमी. या खंडातून विषुववृत्त, कर्कवृत्त व मकरवृत्त ही तीनही वृत्ते जातात. विषुववृत्त हे जवळजवळ मध्यातून जात असले, तरी या खंडाचा सु. दोन तृतीयांश भाग त्याच्या उत्तरेस आहे व सु. पाच षष्ठांश भाग उष्णकटिबंधात आहे. उत्तरेस जिब्राल्टरच्या चिंचोळ्या सामुद्रधुनीने ते यूरोप खंडापासून अलग झालेले असून ईशान्येस सिनाईच्या द्वीपकल्पाने ते आशियाशी जोडले गेले आहे. याच्या उत्तरेस भूमध्य समुद्र, पश्चिमेस अटलांटिक महासागर व पूर्वेस तांबडा समुद्र व अरबी समुद्र यांसह हिंदी महासागर असून, दक्षिणेस २०० पू. रेखावृत्त ही अटलांटिक व हिंदी महासागर यांमधील सीमा मानली जाते.