आई आणि मुलगी संवाद लेखन
Answers
Answer:
प्रार्थना सदावर्तेदिव्या एका मिलिटरी स्कूलमध्ये शिकणारी मुलगी. ती आठवीपर्यंत मिलिटरी स्कूलच्या हॉस्टेलमध्ये राहिलेली. पण नववीचे वर्ग सुरू होण्यापूर्वी तिच्या आई-बाबांनी तिचं नाव शाळेतून आणि तिथल्या हॉस्टेलमधून काढून घेतले. हॉस्टेलची अॅडमिशनही रद्द केली अन् ते ज्या शहरात राहत होते, तेथे त्यांच्या घराजवळच्याच शाळेत दिव्याला काहीही पूर्वकल्पना न देता घालून टाकलं.पण यामुळे दिव्याच्या दैनंदिन जीवनात अचानक बदल झाला. तिचा भोवताल बदलला. शाळा बदलली, मित्र-मैत्रिणी, त्यांचा ग्रुप, शिक्षक-शिक्षण पद्धती, हॉस्टेलमधील रूममेट सगळं काही बदललं. ती लहान होती तेव्हा तिच्या मर्जीविरुद्ध तिला घरापासून लांब मिलिटरी स्कूलमध्ये घातलं. त्या मिलिटरी स्कूलमध्ये दिव्या चांगली रूळलेली असताना अचानक तिचा शैक्षणिक प्रवास वेगळ्या दिशेनं सुरू झाल्यानं ती खूप गोंधळलेली होती. त्यातच तिचं आणि तिच्या आईचं अजिबात पटत नव्हतं. त्याचा वेगळा तणाव दिव्याच्या मनावर होता. हे असं व्हायला नको असं दिव्याला खूप वाटत होतं, पण आईशी कुठल्या ना कुठल्या विषयावर वाद सुरूच होता. आता अशावेळी घरात नेमकं कसं वागलं तर हे प्रश्न सुटतील..हे असं का होतं?* आपल्या जीवनपद्धतीत मुलांना आणि विशेषत: मुलींना काय हवंय, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, भाव-भावना काय आहेत याचा विचारच फारसा केला जात नाही..* मुलींच्या मनाप्रमाणे त्यांना जगू देण्याचा