World Languages, asked by shweta2241, 11 months ago

आई बाबा हेच आमचे दैवत मराठी निबंध​

Answers

Answered by mitaligawai
103

Answer:

आई बाबा या दोन शब्दांचं इतके महत्व आहे आपल्या आयुष्यात कि सांगता येणार नाही,कारण हे फक्त शब्द नाहीयेत तर आपले आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त जन्मचं नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले,आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे आई बाबा.

अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ते आपल्यासाठी झटत आहे नको ते कष्ट,हव्या त्या नको त्या सर्व गरजा पुरवत आहे,

पण खरं म्हंटल तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आईबाबांचं महत्व विसरत चालले आहे. कारण आई बाबा हे शब्द आता फारसे ऐकूही येत नाही त्यांची जागा आता मम्मी,मॉम,पपा,ड्याड ह्या शब्दांनी घेतली आहे आणि या शब्दांमुळेच आईबाबांचं महत्व कमी झालंय असं वाटायला लागलं आहे.पण खरं म्हंटल तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आईबाबांचं महत्व विसरत चालले आहे. कारण आई बाबा हे शब्द आता फारसे ऐकूही येत नाही त्यांची जागा आता मम्मी,मॉम,पपा,ड्याड ह्या शब्दांनी घेतली आहे आणि या शब्दांमुळेच आईबाबांचं महत्व कमी झालंय असं वाटायला लागलं आहे.

काळ बदलतोय तसं आईबाबांसोबत चे जे संबंध आहे आजच्या मुलामुलींचे तेही बदलताना दिसत आहे,तो आदर ती नम्रता ह्या गोष्टींची कमतरता भासायला लागली आहे असं वाटतं. जसे जसे मुलंमुली मोठे होत चालले आहे तसं आईबाबांच्या सोबतचे ते बोलणं बसणं कमी होत जातं,जे निर्णय घेयचे असतात मुलामुलींना ते जवळच्या मित्रांना ते सांगणं योग्य त्यांना वाटतं पण आईबाबांना नाही का? तर ते बोलतील रागावतील त्यांना त्यातलं काही कळत नाही अशी आजच्या मुलामुलींची स्थिती होत चालली आहे,आणि यातच आईबाबांचे महत्व आपण विसरत चाललोय असं वाटतं.

आपल्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी पाहिले काय योग्य काय नाही हे त्यांना चांगलं माहित असते तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही,बोलले तर त्याचा आपल्याला त्रास वाटतो सहन होत नाही,कारण बदलत्या वेळेनुसार आपणही बद्दलो आणि त्यांचा त्रास होतो म्हणून त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवतो का तर ते नसले कि आपलं आयुष्य असं मोकळं आपणंच आपल्या मनाचे राजे.खरं तर त्यांनी असे दिवस पाहायला आपल्याला जन्म दिलेलं नसतो,पण आपण त्यांचा मनाचा विचार कुठं करतो त्यांचा भावना आपण कुठे समजून घेतो.

आईबाबा हे दोनच असे व्यक्ती आहे जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात तेच आपल्या जवळ असतात पण आपण त्यांना आपल्या जवळच समजत नाही,ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायचे शिकवले त्यांना आज आपण महत्व देत नाही. खरं तर आईबाबा हे दोनच असे आहेत ह्या विश्वावर ज्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत आणि हेच आजचे मुलंमुली विसरत चालले आहे.

Answered by halamadrid
31

Answer:

आई वडील हे आपल्यासाठी देव आहेत.एखाद्या वेळी,देवाचे नमस्कार करायला विसरलात तरीही चालेल,पण आई बाबांना नमस्कार करायला विसरु नका.त्यांच्या चरणांमध्ये स्वर्ग असते.त्यांची सेवा केल्यावर पुण्य मिळते.

प्रत्येकाच्या जीवनात आई वडिलांचे महत्वपूर्ण स्थान असते.आई आपल्यला जन्म देते आणि आपले वडील खूप कष्ट करून आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतात.

आई वडील आपल्यासाठी आयुष्यात खूप काही गोष्टी करत असतात.आपल्या लहानपणापासून ते आपण मोठे होईपर्यंत आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात,आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता होऊ देत नाही.

संपूर्ण जग आपल्याविरुद्ध उभा राहिला,तरीही ते आपला साथ काधीही सोडत नाहीत.स्वतःचा विचार करण्या अगोदर ते आपला विचार करतात.ते नेहमी आपल्याला चांगली शिकवण देत असतात.जीवनात आपल्याला यश मिळो,हीच त्यांची इच्छा असते.

अशा या देवासारख्या आई वडिलांचा आपण नेहमी आदर केला पाहिजे.त्यांच्या सगळ्या गोष्टी एकल्या पाहिजेत,कारण ते नेहमी आपल्या भल्यासाठीच बोलत असतात.आपल्या जीवनात त्यांचे स्थान सगळ्यात उच्च असले पाहिजे.

Explanation:

Similar questions