आई हा दोन अक्षरी शब्द असला तरी किती अर्थपूर्ण व महत्त्वपूर्ण आहे ! आदि शंकराचार्यांनी संन्यास
घेतला पण त्यांची आईवरील भक्ती तुटली नाही. संन्यस्त स्थितीत त्यांनी आईचे अंत्यदर्शन घेतले. समर्थांनी विरक्ती
पत्करली, पण त्यांची मातृनिष्ठा सुटली नाही. 'आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी' म्हणणाऱ्या कवी यशवंत
बनी आइविषयी व्यक्त केलेला उत्कट भाव कोणाच्याही अंत:करणाचा ठाव घेणारा आहे. उपनिषदकारांनी तर
आईला परमेश्वर मानले आहे. 'मातृदेवो भव ।' या वचनातून त्यांची अभिव्यक्ती होते. आई म्हणजे एक व्यक्ती
नसून आई म्हणजे मांगल्य, वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा, सात्त्विकता, ऋजुता इत्यादी भावभावनांचे उत्कट दर्शन आहे.
शहरी वा ग्रामीण, सुशिक्षित वा अशिक्षित, श्रीमंत व गरीब वा वृद्ध असली तरी आई अखेरीस आईच असते.
आई म्हणजे चैतन्याचा अखंड झरा आहे. सर्व आश्रय संपतात पण आईचा आश्रय कधीच संपत नाही. सर्व अपराध
पोटात घालणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई. सारांश लेखन
Answers
Answer:
आई
आई हा शब्द फार मोठा आहे . आपली आई वरील भक्ती कायम राहिली पाहिजे. जगातील महान व्यक्तींनी आपल्या आईला आपल्या पेक्षा जास्त महान समजले आहे . या जगात आई या शब्दा शिवाय मोठे अक्षर , दागिना कोणताही नाही.आपली आई आपल्याला समजून घेणारी असते म्हणून जगात आई शिवाय कोणी मोठे नाही.
Answer:
'आई' हा दोन अक्षरी शब्द असला तरी किती अर्थपूर्ण व महत्त्वपूर्ण आहे ! आदि शंकराचार्यांनी संन्यास
घेतला पण त्यांची आईवरील भक्ती तुटली नाही. संन्यस्त स्थितीत त्यांनी आईचे अंत्यदर्शन घेतले. समर्थांनी विरक्ती पत्करली, पण त्यांची मातृनिष्ठा सुटली नाही. 'आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी' म्हणणाऱ्या कवी यशवंत यांनी आईविषयी व्यक्त केलेला उत्कट भाव कोणाच्याही अंत:करणाचा ठाव घेणारा आहे. उपनिषदकारांनी तर आईला परमेश्वर मानले आहे. 'मातृदेवो भव।' या वचनातून त्यांची अभिव्यक्ती होते. आई म्हणजे एक व्यक्ती नसून आई म्हणजे मांगल्य, वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा, सात्त्विकता, ऋजुता इत्यादी भावभावनांचे उत्कट दर्शन आहे. शहरी वा ग्रामीण, सुशिक्षित वा अशिक्षित, श्रीमंत व गरीब वा वृद्ध असली तरी आई अखेरीस आईच असते. आई म्हणजे चैतन्याचा अखंड झरा आहे. सर्व आश्रय संपतात पण आईचा आश्रय कधीच संपत नाही. सर्व अपराध पोटात घालणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई.