India Languages, asked by angelpriya, 1 year ago

आई संपावर गेले तर.....
Essay in marathi

Answers

Answered by halamadrid
4

Answer:

खूपजण संपावर जातात.पण आई कधीच संपावर जात नाही. खरेच आई संपावर गेली तर...!

रोज सकाळी मला आईच उठवते. माझ्यासाठी व घरातील सगळ्यांसाठी नाश्ता तीच बनवते.सकाळी कॉलेजला जाताना मी महत्वाचे पुस्तके घेतली आहेत ना, ह्याची आठवण करून देते.पण जर तीच संपावर गेली,तर हे सर्व कोण करील?

आई खूप छान स्वयंपाक करते.ती चाइनीज पदार्थ खूप छान करते.जर ती संपावर गेली,तर माझ्यासाठी जेवन कोण बनवणार?

माझ्या मनातील सगळ्या चांगल्या वाइट गोष्टी मी तिला सांगते,तेव्हा मला बरं वाटतं.ती नेहमी मला प्रोत्साहन देत असते.माझे फार लाड करते.सकाळी उठल्यापसून ते रात्री झोपेपर्यंत मला लहान सहान गोष्टींसाठी तिची गरज लागते. जर ती संपावर गेली,तर माझी नक्कीच तारंबळ उडेल.

"आई संपावर गेली,तर" हा विचारसुद्धा मनात नाही आणला पाहिजे.

Explanation:

Answered by ItsShree44
2

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀आई संपावर गेली तर...

आमच्या घरात सगळे आळशी बनले आहेत. एकटी आईच सर्व कामे करते. आई आमच्यावर रोज रागावते. पण कोणीही आपापली कामे करत नाही. एकदा आई खूप चिडली आणि म्हणाली, “मी आता संपावरच जाणार!"

बापरे, आई संपावर गेली तर... तर सकाळी लवकर कोण उठवणार? गरम गरम नाश्ता कोण देणार? दप्तर कोण भरून देणार? शाळेतून आल्यावर जेवण कोण देणार? गृहपाठात मदत कोण करणार? प्रकल्प तयार करण्यास, स्पर्धेचे भाषण तयार करून देण्यास कोण मदत करणार? वाढदिवसाचा सुंदर केक कोण बनवणार?

घरातील वस्तू नीटनेटक्या कोण ठेवणार? बाबांना तर त्यांची प्रत्येक वस्तू हातात आणून दयावी लागते. मग आई संपावर गेली तर...? तर बाबांचे तरी कसे होणार? मी बाबांना खूण केली, “आपण आईचे ऐकू या. ती सांगते ते योग्यच आहे. आपण आपली कामे स्वत:च करू या."

Similar questions