India Languages, asked by manan3632, 9 months ago

आईची थोरवी मराठी निबंध​

Answers

Answered by halamadrid
52

■■ आईची थोरवी ■■

आईची थोरवी या विषयावर लिहू तितकं कमी आहे, कारण आईची महानता शब्दात सांगणे खूप कठीण आहे. आई म्हणजे सदैव तिच्या मुलांसोबत त्यांच्या सुखा दुखात असणारी, त्यांचे समर्थन करणारी, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती. असे म्हटले जाते की देव सगळीकडे नसू शकतो, म्हणून त्याने आईला बनवले.

आई आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळची आणि सगळ्यात खास व्यक्ति असते. ती आपली खूप काळजी घेते, आपल्यावर प्रेम करते ,आपले खूप लाड करते.

इतर कोणीही जर आपली साथ नाही दिली तरी आई नेहमी सुखादुखामध्ये आपली साथ देते,आपल्याला नवीन गोष्ट शिकण्यासाठी प्रोतसाहन देते. आईकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. तिच्या मार्गदर्शनाने आपल्याला आपल्या जीवनातील कठीण निर्णय घेता येतात.

खरंच आई एक महान दैवत आहे.

Similar questions