English, asked by hardi9056, 7 months ago

आईची थोरवी निबंध 1 minutes

Answers

Answered by Antaradj
1

Answer:

आईची थोरवी

प्रेमस्वरूप आई ; वात्सल्यसिंधू आई ,

वसविन नित्य तुला ,मी माझ्या हृदयमंदिरी।।

आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचा देवी साक्षात्कार म्हणजे आई . आई हा किती गोड शब्द ! केवढे माधुर्य भरलेले आहे या शब्दात ! सारे जग या शब्दापुढे डुलत राहील एवढी जादू आहे या शब्दात आई हा शब्द उच्चारताच प्रेम,माया,ममता या देवता उभ्या राहतात.

पण काहींच्या नशिबात हे आईचं प्रेम,माया,ममता नसते. त्यांना पोरकेपणा भोगावा लागतो. खरचं ! त्या मुलांच्या पोरकेपणाची कथा खूप तीव्र असते. म्हणून म्हणावेसे वाटते ,

आईविना मूल म्हणजे

सुगंधविना फूल ,

वाऱ्याविना धूळ ,

विस्तावाविना चूल असते.

ज्या मुलांच्या डोक्यावरचा आईच्या मायेचा हात लवकर नाहीसा होतो, अशा मुलांना परिस्थितीच संकटास सामोरे जाणे शिकवते. आई ! प्रेमाचे माहेर , पावित्र्याचे मूर्तिमंत तेज जिच्या चेहऱ्यावर दिसते ती आई . अशा या आईची महती वर्णन करण्यास शब्दभांडारही अपुरे पडेल . मनात उठलेले वादळ आईच्या मांडीवर झोपले असतानाच शांत होते . संकटात असताना आईचा प्रेमळ हात डोक्यावरून फिरला कि , मनास अपूर्व शांतता प्राप्त होते .

आईला कधीच आपल्या लेकराबद्दल भेदभाव माहित नसतो . तिच्या प्रेमाला व्यवहाराची तुलना माहित नसते . तिला माहित असते ते फक्त खरंखुर प्रेम करणं . प्रत्येक आई आपल्या बाळाला जीवापेक्षा जास्त जपते . त्यांच्यावर सुसंस्कार करते . तिची फक्त आपल्या मुलांकडून एकच अपेक्षा असते ती म्हणजे , माझी मुले,मनाने , गुणाने, व पराक्रमाने मोठी व्हावीत व स्वतःचे तसेच आईवडिलांचे नाव कमवावे. जगातील सर्व पराक्रम आईच्या कुशीतच जन्म घेत असतात. मातृप्रेमाचे मंगल स्त्रोत म्हणजे ' श्यामची आई '.

श्यामच्या जीवनात त्याच्या आईने त्याच्या आयुष्याला कसे वळण देऊन त्याचे आयुष्य घडविले , याचे वर्णन साने गुरुजींनी त्यांच्या 'श्यामची आई' या पुस्तकात केले आहे . शिवरायांना घडवणारी जिजाबाई , कृष्णाला घडवणारी कौसल्या हे साक्ष देतात की, आईच्या मायेला अंत नाही. तिची माया चिरंतर , सागराप्रमाणे अथांग आहे . आईला कितीही अलंकारानी सुशोभित केले तरी अपुरेच ! आईकडे प्रेमाचा , मायेचा झरा असतो . तिला सतत आपल्या लेकराची काळजी वाटत असते . म्हणूनच म्हणावेसे वाटते ,

' घार फिरते आकाशी

परि तिची नजर पिलापाशी '

मुलांसाठी ईश्वराचे रुप म्हणून देवाने आई दिलेली असते . विश्वाच्या कानाकोपऱ्यात लक्ष दयायला परमेश्वर देखील असमर्थ आहे . म्हणूनच त्याने ईश्वररुपी आईची मूर्ती तयार केली आहे. मुलेही जीवनात तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यांना प्रेरणा देणारी आई त्यांच्या पाठीशी उभी असते.

आई ही आपल्या मुलांच्या बाबतीत जास्त भावनिक व हळवी असते . आपल्या मुलांच्या जीवनात कधीच कोणते दु:ख येऊ नये म्हणून ती नेहमी ईश्वराकडे प्रार्थना करते. ती सतत गुलाबाच्या फुलाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करते स्वतः काव्यात राहून दुसऱ्यांना सुगंध देते, आईच्या मनाचा थांगपत्ता आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही . कारण आपल्या मुलाने कितीही गुन्हे केले तरी ते ती नेहमीच माफ करत असते. "जगात असे एकच न्यायालय आहे तेथे सर्व गुन्हे माफ असतात ते म्हणजे आईचे

हृदय ." समाजासमोर आपल्या लेकराच्या चुका आपल्या पदराखाली लपवणारी व बाजूला येऊन त्याचा कान पिळून त्याला त्याच्या चुका समजावून सांगणारी ती आईच असते. हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवण्यासारखे दोनच शब्द आहेत. ते म्हणजे आई. आई ही एक अशी देवता आहे की ती आपल्या जवळून नाहीशी झाली तर पुन्हा कधीही मिळू शकणार नाही. पेशाने माणूस काहीही मिळवू शकतो पण एकच अमूल्य हिरा तो मिळवू शकत नाही तो म्हणजे आई ! म्हणून म्हणावेसे वाटते ,

" विद्याधन सर्वकाही मिळे पण आई पुन्हा न मिळे "

आई हा शब्द कुणाला शिकवावा लागत नाही. तो आपोआपच तोंडातून बाहेर पडतो. मुलांना चालताना अचानक ठेच लागली की, त्यांच्या तोंडून 'आई 'हा शब्द बाहेर पडतो. इतके पावित्र्य या शब्दात सामावलेले आहे. म्हणूनच साने गुरुजींनी म्हटले आहे,

" जो आईची पूजा करतो , जग त्याची पूजा करील ."

आई कामानिमित्त कितीही दूर असली तरी तिचे लक्ष पाळणाघरातील आपल्या बाळाकडे असते. मुलांच्या बाबतीत ती कृतज्ञ असते. कृतज्ञता हा सर्वात मोठा सद्गुण आहे. आणि तो आताच्या नव्या पिढीतील मुलांकडून जवळजवळ हद्दपार होत चालला आहे. व मुले आईवडिलांना फेकून देण्याचा अडगळीचा माळा म्हणून वृद्धाश्रमाचा जास्तीत जास्त वापर करताना दिसतात. मुलांनी जरी घराबाहेर काढले , तरी त्यांच्या मनात कधीही मुलांविषयी वाईट विचार येत नाही, चांगलेच विचार येतात. म्हणून म्हटले आहे , " मेणबत्ती सारखं जळत राहणं आईवडिलांचा स्वभाव असत."

म्हणूनच मुलांच्या कर्तृत्वाला जगात मान असतो. रक्ताच्या नात्यापेक्षा आईच्या दुधाच नातं महान आहे. आई ही स्वतःच्या रक्ताचं दूध आपल्या मुलांना पाजते. म्हणूनच या दुधाच्या नात्यापुढे सारं जग लहान आहे. म्हणून म्हणावेसे वाटते ,

स्वतः सहन केले चटके

दिली मला सावली ,

तिच आहे माझी माऊली ।

तिच आहे माझी माऊली ।

Similar questions