Hindi, asked by pratik8104, 9 hours ago

आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा​

Answers

Answered by saniyashaikh8286
3

Explanation:

आईsss तुला माहितेय का??

बरंच काही सांगायचंय,

पण ओठांतून शब्द काही फुटेना..

न सांगताही माझ्या भावना

तुझ्याशिवाय कुणास काही समजेना..

जेव्हा असतो गं माझा वाढदिवस..

तेव्हा डोळ्यासमोर येतो तुझा धाडसी साहस..

माझ्या जन्माच्या वेळी तू भोगल्या असशील

किती त्या यातना..

म्हणूनच माझा जन्मदिवस साजरा न करिता

तुझीच करिते उपासना..

मातृ-पितृदिन असो वा भाऊ बहीण दिवस,

वा प्रियकर प्रेयसीचा व्हॅलेंटाईन दिवस..

भावनेच्या नावाखाली जाहिराती करून,

मार्केट म्हणतो हाच आमुचा बाजार दिवस..

असे सोहळे मार्केटिंग असले तरीही

तुझ्याप्रति कृतज्ञता सदैव राहील मनात..

भावनेच्या जगात पाझळणारे माझे हृदय

नेहमीच असेल आई तुझ्या कुशीत..

देवाकडे तुझ्या आनंदासाठी मागणे घालून

स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त नाही व्हायचे मला..

तुला मी सुखात ठेवू शकेन,

इतकं सामर्थ्य ईश्वरा दे जरा मला..

मातृदिन तर एक निमित्त असेल

प्रत्येक माऊलीच्या सन्मानासाठी..

तरीही मातृदिनी तुला शुभेच्छा देते

माझ्या आईच्या आनंदासाठी..

आई तुला मातृदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

Answered by aaryashgaikwad145
2

Explanation:

please like and brain list

Attachments:
Similar questions