आजी आजोबा ला दिवाळी वर बोलवण्यसाठी पत्र लिहा इन मराठी
please answer who know Marathi
I make them brainlist and rate there answer as 5 star please answer fast
Answers
Answer:
दिवाळी आजी-आजोबांची’ या विषयावर समस्त आजी-आजोबांनी भरभरून प्रतिक्रिया पोहोचवल्या. काही जण आपल्या बालपणीच्या दिवाळीत रमले. त्या काळाचा मनसोक्त विहार करून आले. त्यातल्या अनेकांना आताच्या पिढीच्या दृष्टिकोनात झालेला बदल मानवलेला नाही तर काहींनी मात्र खुल्या दिलाने हा बदल स्वीकारलाय. हा काळाचा महिमा आहे हे मान्य करून टाकलंय. काय प्रतिक्रिया आहेत आजी-आजोबांच्या हे त्यांच्याच शब्दांत..
‘‘गोविंदा..गो..विंदा। अशी मोठय़ाने आरोळी ठोकत जो कोणी भल्यापहाटे सर्वप्रथम तुळशीसमोरील कारटं फोडेल त्याचा दिवाळीदिवशी भलताच मान असायचा. भेटणाऱ्या प्रत्येकाला ‘मिया फोडलाय पयला कारटां..’ असे छाती फुगवून सांगण्यात त्याला कोण आनंद व्हायचा. कोकणातल्या थंडीत आमची दिवाळी चुलीतल्या कढत पाण्यातील आंघोळीने व्हायची. आमच्या घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. काका, भाऊ, चुलत भाऊ-बहीण असा मोठा गोतावळा होता. एकत्र मजेत दिवाळी साजरी करायचो. रांगेत बसून उटण्यानं मालिश करताना एकमेकांची थट्टा मस्करी करताना मजा यायची, मग नवे कपडे घालून देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं. आणि घरी आल्यावर आठवडाभर श्रमून आई, आजीने केलेल्या फराळाची ताटं समोर यायची.. मस्त वातावरण असायचं ते.’’
आरोंदा, सावतंवाडी येथे राहणारे मोहन पुरुषोत्तम आरोसकर हे ९० वर्षांचे आजोबा, आपल्या बालवयातल्या कोकणातल्या दिवाळीत असे रमून गेले. पण शेवटी भूतकाळातून मन येतं वर्तमानकाळात. थोड खंतावत ते लिहितात,‘‘आता परिस्थितीत बदल हातोय. लोकांचं टायमिंग महत्त्वाचं झालंय. आपुलकीच्या भावनेनं ओथंबलेली शुभेच्छांची जागा कोरडय़ा एस.एम.एस. नी घेतलीय. नातीला विचारलं, ‘अगं, हॅपी दिवाळीचा फोन नाही केलास? आम्हाला विसरलीस की काय?’ तर उत्तर येतं, ‘आजोबा कालच एस.एम.एस. केला की!’ इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी नव्या पिढीचं तन-मन झपाटलंय. वेळ काढून मस्त खाणं, गप्पा हे तर लांबच त्यांना सण, नाती सांभाळायला वेळ नाही. घरात येणाऱ्या नवीन खरेदीवर त्यांचा आनंद बेतलाय असं वाटतं. पण ते आपल्या विश्वात रमलेत हे बघून मीही आनंद मानायला शिकलोय.’
सांगलीचे बंडा यज्ञोपवीत दिवाळीच्या आठवणीत रमताना लिहितात, ‘शेजारपाजारच्या बायका एकमेकींकडे फराळाचे जिन्नस करायला जात. वसुबारसादिवशी दारात आलेल्या गाय-वासराची पूजा करायचो. त्या दिवशी आईचा उपवास म्हणून तिखट मीठ वज्र्य, मग त्या दिवशी फक्त करंज्या, चिरोटे तळायचे. गणपतीचं नाव घेऊन सुरुवातीला मोदक केले जात. चकली पात्रातून काढून तळली की घरातल्या सर्वानी खुसखुशीत चकलीची चव पाहायची. कढईत उरलेल्या त्याच तेलात मग संध्याकाळी चिवडा होई.
Explanation:
Hope this helps you please try to Mark me as brainlists please
‘दिवाळी आजी-आजोबांची’ या विषयावर समस्त आजी-आजोबांनी भरभरून प्रतिक्रिया पोहोचवल्या. काही जण आपल्या बालपणीच्या दिवाळीत रमले. त्या काळाचा मनसोक्त विहार करून आले. त्यातल्या अनेकांना आताच्या पिढीच्या दृष्टिकोनात झालेला बदल मानवलेला नाही तर काहींनी मात्र खुल्या दिलाने हा बदल स्वीकारलाय. हा काळाचा महिमा आहे हे मान्य करून टाकलंय. काय प्रतिक्रिया आहेत आजी-आजोबांच्या हे त्यांच्याच शब्दांत..
‘‘गोविंदा..गो..विंदा। अशी मोठय़ाने आरोळी ठोकत जो कोणी भल्यापहाटे सर्वप्रथम तुळशीसमोरील कारटं फोडेल त्याचा दिवाळीदिवशी भलताच मान असायचा. भेटणाऱ्या प्रत्येकाला ‘मिया फोडलाय पयला कारटां..’ असे छाती फुगवून सांगण्यात त्याला कोण आनंद व्हायचा. कोकणातल्या थंडीत आमची दिवाळी चुलीतल्या कढत पाण्यातील आंघोळीने व्हायची. आमच्या घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. काका, भाऊ, चुलत भाऊ-बहीण असा मोठा गोतावळा होता. एकत्र मजेत दिवाळी साजरी करायचो. रांगेत बसून उटण्यानं मालिश करताना एकमेकांची थट्टा मस्करी करताना मजा यायची, मग नवे कपडे घालून देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं. आणि घरी आल्यावर आठवडाभर श्रमून आई, आजीने केलेल्या फराळाची ताटं समोर यायची.. मस्त वातावरण असायचं ते.’’
आरोंदा, सावतंवाडी येथे राहणारे मोहन पुरुषोत्तम आरोसकर हे ९० वर्षांचे आजोबा, आपल्या बालवयातल्या कोकणातल्या दिवाळीत असे रमून गेले. पण शेवटी भूतकाळातून मन येतं वर्तमानकाळात. थोड खंतावत ते लिहितात,‘‘आता परिस्थितीत बदल हातोय. लोकांचं टायमिंग महत्त्वाचं झालंय. आपुलकीच्या भावनेनं ओथंबलेली शुभेच्छांची जागा कोरडय़ा एस