Science, asked by nutandkadam80, 8 months ago

आज गांधीजी असते तर त्यांनी काय केले असते? या विधानावर 5min भाषण ​

Answers

Answered by ItzRiya07
7

Answer:

hope it's help u

Explanation:

इतिहासाचे मर्म सांगताना गांधीजींनी प्रेम हाच मानवतेचा स्थायीभाव असल्याचे आवर्जून सांगितले. वारंवार निर्माण झालेले कलह जर तलवारीच्या जोरावर सोडवले गेले असते तर मानवजात टिकलीच नसती. उलट, ती फोफावते आहे याचा अर्थ मानवी प्रेरणा मुख्यत: प्रेमाचीच आहे, हा त्यांचा सिद्धांत आहे...

'आज गांधीजी असते तर' हा नेहमी पडणारा प्रश्न. तसाच 'गांधींचा आज संदर्भ काय' असाही प्रश्न विचारला जातो. यामागील मानसिकता परस्परविरोधी वाटते याचे कारण गांधी म्हणजे काय यासंबंधीचा गैरसमज. 'माझे जीवन हाच माझा संदेश' असे गांधीजी सांगत. परंतु गांधी एक विचारपद्धती आहे असेही आपण म्हणू शकतो.

Answered by GeniusKrishnali3
0

Answer:

आज गांधीजी असते तर' हा नेहमी पडणारा प्रश्न. तसाच 'गांधींचा आज संदर्भ काय' असाही प्रश्न विचारला जातो. यामागील मानसिकता परस्परविरोधी वाटते याचे कारण गांधी म्हणजे काय यासंबंधीचा गैरसमज. 'माझे जीवन हाच माझा संदेश' असे गांधीजी सांगत. परंतु गांधी एक विचारपद्धती आहे असेही आपण म्हणू शकतो.

पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा पाया सॉक्रेटिसने प्लेटोमार्फत घातला. गांधीजींनी प्लेटोच्या एका संवादाचा अनुवाद केला होता. हे ग्रीक तत्त्ववेत्ते खोलवर प्रश्न विचारून प्रत्येक शब्द, संकल्पना यांचे मर्म शोधत. गांधीजी आयुष्यभर असाच सत्याचा शोध घेत राहिले. सत्य हे काही परंपरेने वा धर्मग्रंथांनी लिहून ठेवलेले नव्हते. ते प्रत्येकाने वेळोवे‌ळी शोधून काढायचे असते.

ही भूमिका समजून घेतली तर गांधीजी कसे सर्वकालीन आहेत हे चटकन लक्षात येते. सत्याचा शोध हे तर मानवतेचे लक्षण आहे. हा शोध घेताना काही निकष त्यांनी मांडले. अहिंसा हा सर्वांत महत्त्वाचा. इतिहासाचे मर्म सांगताना गांधीजींनी प्रेम हाच मानवतेचा स्थायीभाव असल्याचे आवर्जून सांगितले. वारंवार निर्माण झालेले कलह जर तलवारीच्या किंवा तोफेच्या जोरावर सोडवले गेले असते तर मानवजात टिकलीच नसती. उलट, ती फोफावते आहे याचा अर्थ मानवी प्रेरणा मुख्यत: प्रेमाचीच आहे, हा त्यांचा सिद्धांत. कलहाचे निराकारण करण्यासाठी युद्ध हा एकच उपाय नसून सत्याग्रह हा अधिक प्रभावी पर्याय असू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. तेव्हापासून निदान युद्धाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. अलेक्झांडर किंवा नेपोलियन यांना इतिहास वीरपुरुष मानायचा. अमेरिकेचे प्रेसिडेंट बुश यांनी इराक बेचिराख केला, सद्दामला नाहीसे केले तरी त्यांना कोणी वीरपुरुष मानणार नाही.

Explanation:

Hope it helps:)

Similar questions