आजचा चित्रपट वैयक्तिक प्रतिसाद in marathi
Answers
Answer:
जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट औरंगाबादच्या रसिकांपर्यंत पोचावेत. तसेच चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व औरंगाबादचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोचावे. या उद्देशाने या महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सिनेमा स्पर्धा महोत्सवाच्या पाच दिवसांत भरगच्च कार्यक्रम होत आहेत. महोत्सवात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश आहे. पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे गोल्डन कैलास पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश आहे. ज्युरी समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर आहेत. ज्युरी सदस्य म्हणून प्रेमेंद्र मुजुमदार (कोलकाता), जितेंद्र मिश्रा (दिल्ली), दार गई (युक्रेन) राहणार आहेत.