Math, asked by devjob3274, 10 months ago

आजचा विद्यार्थी आणि शिस्त निबंध

Answers

Answered by alinakincsem
11

निबंध

Step-by-step explanation:

तांत्रिक प्रगती आणि वेगवेगळ्या ट्रेंडमुळे टाइम्स बरेच बदलले आहेत.

आजचे विद्यार्थी आणि शिस्तीच्या कृती देखील बदलल्या आहेत. मागील प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या शिस्तीच्या क्रियांच्या उलट अनेक गोष्टी बदलल्या आहेत.

उदाहरणार्थ, विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांबद्दल आज्ञाधारक आणि आदरयुक्त असायचे. मार्गदर्शकांचे मोल होते. तथापि, काळ बदलला आहे कारण आता शिक्षकांचे कोणतेही मूल्य किंवा कमी मूल्य नाही. शिक्षण हा एक व्यवसाय बनला आहे हे लक्षात घेता शिस्तीचा अभाव आहे.

Please also visit, https://brainly.in/question/1263478

Answered by ItsShree44
23

Answer :

मागच्या पिढीतील लोकांना आजच्या विदयाथ्यांचे सगळेच वागणे गैर वाटते. त्यांना त्यांचे आधुनिक कपडे आवडत नाहीत, त्यांची आधुनिक पद्धतीची केशरचना आवडत नाही; त्यांचे चित्रपटांचे वेड आवडत नाही, पुरुषो पोशाख करण्याची मुलींची फॅशन त्यांना रुचत नाही, मुलामुलींचे परस्परांशी मोकळे वागणे त्यांना बिलकूल पसंत नाही. एकूण आजचा विदयार्थी हा फार बेशिस्त आहे, पार बिघडून गेला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हा विदयार्थी जेव्हा आंदोलन उभारतो, तेव्हा तर त्याच्या बेशिस्तपणाचा कळसच होतो, असे या टीकाकारांना वाटते. पण कोणी असा विचार कधीच करत नाही की, विदयार्थी शिस्त का मोडतात? त्याला काही अंशी विदयार्थ्यांशी संबंधित अशी ही मोठी माणसेच जबाबदार नाहीत का? काही दिवसांपूर्वी विदयार्थ्यांचा एक मोर्चा निघाला होता. कशासाठी? काय मागणी होती त्यांची? तर 'आमच्या परीक्षा वेळेवर घ्या.' आता सांगा, अशी मागणी करणारे विद्यार्थी बेशिस्त कसे?

महाविदयालयांकडून विदयार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण दिले जाते का? कित्येकदा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे अभ्यासक्रमाच्या बाहेरील असतात. म्हणून मग विदयार्थी या प्रश्नपत्रिकांची होळी करतात. कित्येक वेळा परीक्षा होऊन चार-चार महिने लोटले, तरी परीक्षांचे निकाल लागत नाहीत. मग विदयार्थी अस्वस्थ होतात. अशा वेळी त्यांच्यावर बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवला, तर ते त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे नाही का? परीक्षा म्हटली म्हणजे पेपर फुटण्याचा धोका संभवतो. एके वर्षी एका परीक्षेतील एकच पेपर दोन वेळा फुटला! अशा प्रसंगी विदयार्थ्यांनी संयमाने कसे वागावे? कित्येक वेळा परीक्षेचा रिझल्ट जाहीर करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडबड केलेली आढळते.

आजचा विद्यार्थी हा अधिक प्रगल्भ आहे, कर्तबगार आहे, विचारवंत आहे, महत्त्वाकांक्षी आहे. आपल्या हक्कांविषयी तो फार जागरूक आहे. तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चे, घेराव, संप हे मार्ग अनुसरतो. खरे पाहता, आजचा विदयार्थी बेशिस्त नाही. बेशिस्त आहे तो आजचा समाज ! वडीलधाऱ्या माणसांनी त्यांच्यापुढे चांगले ध्येय ठेवले आहे का? स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीपुढे स्वातंत्र्य-संपादनाचे निश्चित ध्येय होते. त्यांच्यासमोर एकाहून एक त्यागी ध्येयनिष्ठांचे आदर्श होते. असे उदात्त कार्य जर या आजच्या विदयार्थ्यांपुढे ठेवले गेले, तर ही युवा पिढी अफाट कर्तृत्व गाजवू शकेल, अनेक संकटप्रसंगी त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे. देशावर नैसर्गिक संकट ओढवो वा परकीय आक्रमण येवो; अशा प्रसंगी हे विदयार्थी आघाडीवर असतात. श्रमदान, रक्तदान करतात.

जिवाची बाजी लावून अडचणींचे डोंगर पार करतात; तेव्हा तर त्यांच्या शिस्तबद्ध वर्तनाला तोड नसते. मात्र आपल्या गुणांचे, कष्टांचे चीज होत नाही, असे पाहिल्यावर हे विदयार्थी प्रक्षुब्ध होतात. याला जबाबदार अर्थातच आपला सारा समाजच आहे. म्हणजेच बेशिस्त कोण असेल, तर तो आजचा समाज ! आजचे विदयार्थी नव्हेत ! आजचे विद्यार्थी हे आदर्श विदयार्थी आहेत. ते उदयाचे जागरूक नागरिक आहेत

Similar questions