India Languages, asked by imaieshamukadam123, 6 months ago

आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे का यावर तुमचे विचार लिया​

Answers

Answered by santoshpatil4553
3

Answer:

please marking on branly

Explanation:

आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे?

आजकाल माझ्या मनात सतत घोंगावत राहणारा एकच प्रश्न आहे,खरंच आजचा विद्यार्थी बेशिस्त आहे? आजकाल आम्हा विद्यार्थ्यांवर टीकेचा चौफेर हल्ला होत आहे.कोणी म्हणतो,आजचे विद्यार्थी बेजाबदार आहेत,कोणी म्हणातो ध्येयशून्य आहेत.तर कोणी म्हणतो पथभ्रष्ट आहेत. विद्यार्थ्यांवर टीका कराव्या अशा काही घटना,त्याची दहावीस उदाहरणे घडली असतीलही.पण टीका करताना एकतर्फी विचार करणे आम्हा विद्यार्थ्यांवर अन्यायाचे आहे.यासंबंधात विद्यार्थ्यांची बाजूही लक्षात घ्यायला हवी.ती कोणीच लक्षात घेत नाहीत.

प्रत्येक दिवसाचे न्यूजपेपर हे विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचे एक ना एक उदाहरण हमखास देते.विद्यार्थी बेशिस्त झाले आहेत असे विद्यार्थ्याखेरीज प्रत्येक जण बोलतो.तसे बोलावे असे काही प्रकार घडलेही आहेत.परंतु माझ्या मते बेशिस्त विद्यार्थ्यांस बेशिस्त समाजच घडवीत असतो, हे अनेकजण विसरतात.विद्यार्थी बेशिस्त का वागतात,याचा विचार आणि त्या समस्येवर उपाय शोधणे यांचा आपल्याकडे अभावच आहे.

आजचा विद्यार्थी बेशिस्त नाही,तर कर्तृत्ववान आहे,तो एक पुस्तकी किडा राहिलेला नाही,तर त्याला सभोवतालच्या अनेक गोष्टींची जाणीव आहे.कॉम्प्युटरचा योग्य वापर तो करतो आहे. कॉम्प्युटरच्या वापरावरून पण आजचा विद्यार्थी बेशिस्त या उपाधीेस पात्र ठरतो.जणू काही आजचे विद्यार्थी बेेशिस्तीचे टॅग घेऊनच फिरत आहेत.लोक म्हणतात,आजचे विद्यार्थी बिघडले आहेत.फेसबुक,व्हॉटसअप सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर वर तशी उदाहरणे घडलेही आहेत.परंतु त्यास विद्यार्थ्यांना दोष देणे कितपत योग्य आहे?सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर हा विद्यार्थी चांगल्या कामांसाठी सुद्धा करतो.पण हा समाज प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांस वाईट दृष्टीच्या काम करण्या हेतूने पाहतो. ज्याप्रमाणे नाण्यास दोन बाजू असतात,तशाच प्रत्येक गोष्टीला चांगली व वाईट या दोन्ही बाजू असणे स्वाभाविकच असते.तासनतास साईट्सवर वेळ वाया घालवणे,यात आम्ही विद्यार्थी चुकतो पण त्यामुळे आम्ही बेशिस्त किंवा बेजबाबदार ठरत नाही.आजचा विद्यार्थी हा मल्टीटॅलेन्टेड आहे.आज प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी पुढे आहे.विचारशील आहे.सरकारच्या प्रत्येक निर्णयावर त्याचे ठाम मत आहे.तो ध्येयशून्य नाही तर ध्येयकेंद्रीत आहे.

आज विद्यार्थी अनेक छंद जोपासतो.ट्रेकिंगला जाणे,समाजसेवा म्हणून आदिवासी भागात किंवा झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन शिकवणे,विविध उपक्रम राबवणे यांसारखी कामे करतो.तेव्हा टीका करणारे टिकाकार म्हणातात,'हल्ली कॉलेजमधून अभ्यासाऐवजी अशी ही नसती फॅडच जास्त असतात'. 'छडी लागे छमछम विद्या येई घमघम' ही म्हण आज अस्तितवात नाही.कारण लादलेल्या किंवा अधिकार गाजवून शिस्त लावणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आणि कठीण आहे,असे मला वाटते.Discipline must be based on love,must be controlled by love. असे आम्ही विद्यार्थी मानतो.

जोपर्यंत अनाचारी,भ्रष्टाचार,स्वार्थी अधार्मिकता आजूबाजूला आहे,तोपर्यंत समाजास विद्यार्थी हा बेशिस्तच वाटेल.शिस्तबद्ध विद्यार्थी हा चारित्र्यसंपन्न विद्यार्थी,चारित्र्यसंपन्न विद्यार्थी हा चारित्र्याभष्ट समाजापोटी नाही जन्माला येऊ शकत.टीकाकारांना आजचे विद्यार्थी उद्दाम,उद्धट वाटतात.कारण त्यांच्या मते,आम्ही विद्यार्थी शिक्षकांना द्यावा तितका मान देत नाहीत.पण ही माणसे विद्यार्थ्यांची मने समजून घेतात का? 'आदर दाखवा' म्हणून कोणालाही आदर दाखवता येत नाही. ज्या व्यक्तीची वागणूक आदरास्पद आहे किंवा असते,यांच्यापुढे आम्ही विद्यार्थी कोणीही न सांगता आदराने नतमस्तक होतो.

आजच्या विद्यार्थ्यांस वेगवेगळ्या फॅशन करायला आवडते.हीरोहेरॉईनसना फॉलो करायला आवडते.तो पिक्चर मधील हेरोवर फिदा होतो,क्रिकेट स्टार वर फिदा होतो,यात विद्यार्थी बेशिस्त का ठरावेत? सर्व गोष्टी जरी विद्यार्थी करत असला तरी तो बेशिस्त नाही की अविवेकी नाही.आजचा विद्यार्थी अधिक प्रगल्भ,जबाबदार व विचारशील आहे.त्याला आपल्या हक्काची जाणीव आहे व त्याबद्दल आम्ही जागरूक आहोत.हक्क आणि कर्तव्ये यांची योग्य सांगड आम्ही घालतो.राष्ट्रावर येणाऱ्या,कोणत्याही आपत्तीच्या वेळी धावून जाणारा,हंड्यासारख्या नरबळी,बालविवाह यांसारख्या अयोग्य रूढींविरुद्ध लढणारा,बलात्कार, अॅसिड हल्ला यांसारख्या चीड आणणाऱ्या गोष्टींवर पेटून उठणारा ,वेळोवेळी रुग्णासाठी,जवानांसाठी रक्तदान करणारा आजचा विद्यार्थी बेशिस्त कसा?

Answered by barmansuraj489
0

Concept introduction:

वर्गात किंवा इतर शिक्षण विभागात नोंदणी केलेल्या व्यक्तीला विद्यार्थी म्हणून संबोधले जाते. युनायटेड किंगडम आणि बहुसंख्य कॉमनवेल्थ राष्ट्रांमधील प्राथमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी; माध्यमिक शाळांमध्ये आणि त्याहून अधिक प्रवेश घेतलेले विद्यार्थी.

Explanation:

या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यावे लागेल.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्हाला एक प्रश्न देण्यात आला आहे.

माझ्या मनात सध्या एकच विचार आहे: आजचे विद्यार्थी खरंच व्यत्यय आणणारे आहेत का? आज आपल्या शिष्यांवर सतत टीका होत असते. आजचे विद्यार्थी, काहींच्या मते, निष्काळजी, लक्ष न देणारे आणि चुकीची माहिती देणारे आहेत. जरी 10 किंवा 20 वेळा विद्यार्थ्यांवर टीका झाली असेल, तरीही आमच्या विद्यार्थ्यांवर पक्षपाती दृष्टिकोन ठेवून टीका करणे अन्यायकारक आहे.

दररोजचे वर्तमानपत्र विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाची एक किंवा अधिक उदाहरणे देतात. विद्यार्थ्याचा अपवाद वगळता आजकाल विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचा अभाव आहे हे सर्वजण मान्य करतात. असे प्रवचन प्रसंगी ऐकले आहे. त्यावर विचार करणे आणि त्या समस्येवर तोडगा काढणे हीच आपल्यात कमतरता आहे.

Final answer:

प्रश्नाचे अंतिम उत्तर आहे विद्यार्थ्यांवर 10 किंवा 20 वेळा टीका झाली असली तरी, आमच्या विद्यार्थ्यांवर पक्षपाती दृष्टिकोन ठेवून टीका करणे अयोग्य आहे. विद्यार्थ्याचा अपवाद वगळता आजकाल विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचा अभाव असल्याचे सर्वजण मान्य करतात. त्याबद्दल विचार करून त्या समस्येचे निराकरण करण्यात आपल्यात काय कमतरता आहे.

#SPJ2

Similar questions