आजच्या तरुणाईशी भाषा निबंध
Answers
Answered by
3
Answer:
‘आमच्या वेळेला’ हा कित्येकांचा परवलीचा शब्दप्रयोग असतो. दोन पिढ्यांतील फरक; किंबहुना नवीन पिढी ही कशी आमच्यापेक्षा मागे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जवळपास प्रत्येकच पिढी या शब्दांचा आधार घेत असते हे आणखी विशेष! उदा. ‘तुम्ही लोक काय हे फेसबुक वगैरे घेऊन बसता. आमच्या वेळेला हे काही नव्हतं. टीव्ही होता जेमतेम.’ असे एखाद्या घरी वडील बोलतात न बोलतात तोच ‘आमच्या वेळी तर टीव्हीसुद्धा नव्हता. भजन-कीर्तन हेच मनोरंजनाचे उद्योग होते.’ असे आजोबा म्हणतात. अर्थात आजकाल आपण विकेंद्रित कुटुंबांत राहत असल्याने असा तीन पिढ्यांचा संवाद क्वचितच घडतो म्हणा; वाटल्यास हा काल्पनिक संवाद आहे असे मानून चालू. सांगण्याचा उद्देश इतकाच; की घरोघरी अशाच मातीच्या चुली असतात.
please mark me as brainliest
Similar questions