आजकाल आपण विसरुन
गेलेल्या गोष्टी
Answers
Explanation:
माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपूट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल असं नाही मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाही. आता कासरा आपल्या एकट्याच्याच हाती नाही हे ध्यानात येतं आणि ही गोष्ट राहून गेली असं फार वेळा वाटायला लागतं. अशा राहून गेलेल्या गोष्टींत काही वैयक्तिक असतात, तर काहींचं समाजात आवश्यक असलेल्या घडामोडींशीही नातं असतं. आयुष्यात काही वैयक्तिक भोगाच्या आणि आनंदाच्या गोष्टी असतात तशा सामाजिक जबाबदाऱ्या स्वेच्छेनं उचलायच्याही गोष्टी असतात. त्या जबाबदाऱ्याही आनंदानं पार पाडायचं कर्तृत्व, म्हणूनच अंगावर घ्यायच्या असतात. ताजमहाल पाहायचा राहून गेला किंवा काशीयात्रा राहून गेली ही वैयक्तिक गोष्ट झाली. तसल्या हौशी पुरवण्याच्या गोष्टींना अंत नाही. मनात जे जे आलं ते ते साध्य झालं असं जगात कुठल्याच माणसाला म्हणता येणार नाही.