Social Sciences, asked by rohantayade474, 1 month ago

आजकाल उद्योगांनातील कोणात्या संबंधाना महत्त्व आहे​

Answers

Answered by XxitsamolxX
1

Answer:

आंतरराष्ट्रीय संबंध

दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत येणाऱ्या सलोख्याच्या, तटस्थतेच्या किंवा संघर्षाच्या संबंधाना व्यापक अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ असे म्हणतात. एका राष्ट्रातील व्यक्तीचा अथवा व्यक्तींच्या समूहाचा दुसऱ्या राष्ट्रातील व्यक्तीशी अथवा व्यक्तींच्या समूहाशी अनेक कारणांनी संबंध येतो. या संबंधाचे परस्परांच्या हिताच्या दृष्टीने नियमन करण्याचे कार्य शेवटी शासनाच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे साधारणपणे दोन अगर अधिक स्वतंत्र राष्ट्रांमधील राजकीय संबंधाना ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ म्हणतात.

जागतिक राजकारणात अपरिहार्यपणे अनेक राष्ट्रांचे परस्परांशी संबंध व संघर्ष निर्माण होत असतात. केवळ स्वत:च्या भौगोलिक मर्यादेत राहून कोणत्याही राष्ट्राला अलिप्तपणे सुखी व संपन्न जीवन जगणे शक्य नसते. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय संबंध प्राचीन काळापासून अस्तित्वात असले, तरी विसाव्या शतकात या संबंधाना जागतिक राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रीय सामर्थ्याच्या अधिष्ठानावर जागतिक राजकारणात आपले स्थान निश्चित करीत असते. भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, नैसर्गिक साधनसामग्री, औद्योगिक व शास्त्रीय प्रगती, लष्करी सुसज्जता, राष्ट्रीय चारित्र्य व मनोधैर्य, स्थिर राज्यव्यवस्था व जीवनविषयक तत्वज्ञान इ. गोष्टींवर राष्ट्रीय सामर्थ्य अवलंबून असते.

भौगोलिक द्दष्ट्या जगाच्या नकाशावरील एखाद्या राष्ट्राचे स्थान व तेथील हवामान ह्या गोष्टींनाही त्या राष्ट्राच्या परराष्ट्रनीतीच्या उत्क्रांतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्राच्या संरक्षणासाठी सैन्यबळ आणि नैसर्गिक साधनसामग्रीचा उपयोग व विकास यांसाठी प्रचंड लोकसंख्येला महत्त्व असले, तरी त्याबरोबर वाढत्या लोकवस्तीसाठी नव्या वसाहती मिळविण्याच्या प्रयत्नाला सुरूवात होते. यातूनच सबल व दुर्बल राष्ट्रांत संघर्षाला सुरूवात होते. लोखंड, कोळसा, पेट्रोल, युरेनियम यांसारख्या महत्वाच्या खनिज संपत्तीचे साठे व अन्नधान्यासाठी सुपीक जमीन व अनुकूल हवामान ज्या राष्ट्राजवळ आहे, ते राष्ट्र जागतिक सत्तास्पर्धेत प्रभावी ठरण्याची शक्यता असते. निसर्गदत्त साधनसामग्रीच्या विषम वाटणीतून व खनिजद्रव्यांचे साठे असलेले प्रदेश मिळविण्याच्या स्पर्धेमधून आंतरराष्ट्रीय संघर्षाला सुरूवात होते.

Similar questions