आकूती पूर्ण करा श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये
Answers
Explanation:
hope it will be help you ❣️♥️
Answer:
त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे श्रावणमासी या कवितेचे कवी आहेत. ऊन-पावसाचा लपंडाव, सर्वत्र हिरवळ पसरलेली, आकाशात इंद्रधनुष्याचे उमटणे ही श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये आहेत.
प्रस्तुत कवितेत कवींनी श्रावण महिन्यातील पावसाचे सुंदर वर्णन केलेले आहे. कवी बालकवी व निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध आहे. कवी सांगतात श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली दिसून येते. कधी पाऊस पडतो तर कधी ऊन पडते असा ऊन-पावसाचा लपंडाव हा चालू असतो.
आकाशातील इंद्रधनुष्य बघून असे वाटते कुणीतरी आकाशाला सुंदर असे तोरण बांधले आहे. कधी ढग दाटून येतात तर कधी तर कधी पिवळे ऊन पडते. संध्याच्या समयी ढगांचे वेगवेगळे रंग दिसून येतात. हिरव्यागार कुरणावर पाडसांसोबत सुंदर हरिणी बागडताना दिसतात. हिरव्या कुरणावर गाई वासरे चरतांना दिसतात.
वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांचा सुगंध दरवळताना बघून मनाला आनंद वाटतो. अशाप्रकारे कवींनी या कवितेत श्रावणातील पावसाचे मनमोहक वर्णन केलेले आहे.