(२) आकृती पूर्ण करा.
युनियन हायस्कूलमधील शिक्षकांचे गुण
Answers
Answer:
Explanation:
वयाच्या सहाव्या वर्षीच लेखकांचे वडील वारल्यामुळे त्यांना व त्यांच्या आईला गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’ तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये रहावे लागले. तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली असताना. दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आईबरोबर शिक्षणाची आस असलेल्या लेखकांना रहावे लागले. यावरून परिस्थितीशी मिळते जुळते घेत आलेल्या संकटांशी सामना करणे हा गुण त्यांच्यातून दिसून येतो. महापालिकेच्या खेतवाडीतील शाळेत वयाच्या बारा वर्षांपर्यंत शिक्षण घेत असताना त्यांना पायात चप्पलही घालायला मिळाली नाही. अशा परिस्थितीत ते शाळा शिकले. यावरून शिक्षणाविषयीची त्यांची चिकाटी, आस्था या गुणांचे दर्शन घडते.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती तेवढेही रुपये त्यावेळी त्यांच्याकडे नव्हते. प्रवेश फी नसल्याने आईच्या ओळखीच्या बाई (माऊली) मदतीला धावून आली पण तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. शेवटी कसाबसा युनियन हायस्कूल मध्ये प्रवेश मिळताच लेखकांचा पुढील प्रवास सुरु झाला. छोटाशा खोलीत पूरक वातावरण नसताना लेखकांनी आपले शिक्षण थांबवले नाही, तर अशाही वातावरणात त्यांच्या जिद्दीची दाद दयावीशी वाटते. ते पुढे मिळते जुळते घेत शिकतच राहिले.
त्याचवेळी लेखकांच्या हळव्या मनावर त्यांच्या शिक्षकांच्या शिकवण्याचा जो परिणाम झाला त्यामुळे त्याच्या अभ्यासाचा पाया पक्का झाला. शिक्षणाबददल त्यांना अजून ओढ वाटू लागली.
शिक्षणाशिवाय या जगात तरणोपाय नाही हे कळल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना वाटेल त्या परिस्थितीत शिकवण्याचे ठरवले. कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्यांच्या वह्या करायची. अखंड पेन्सिल न मिळाल्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहित गेले. एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे प्रयोगाने सिदध करून दाखवले व माशेलकरांना त्यांच्यातील उर्जाशक्तीचे रुप ओळखण्यास प्रवृत्त केले. त्यावरून त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.
या सर्व प्रसंगांतून लेखकाचा आत्मविश्वास वाढवून दिला. जगण्याचे भान मिळाले. आणि पुढे लेखक फार मोठे वैज्ञानिक संशोधक झाले.