आकलन अर्थ मराठी answer the questions
Answers
Answer:
एक अर्थ तर असा पण होतो की त्यांचे असे आकलन आहे की या वर्षी साधारण पणे पिकाची टक्केवारी 88 %राहील. या जागी या शब्दाला अंदाज या अर्थाने घेतला आहे. पण अंदाज बांधणे म्हणजे आकलन नव्हे. अंदाज ही एक प्रक्रिया आहे मोजण्याची किंवा आडाखे बांधणे यासारखी.
असो cognition किंवा उमगणे किंवा समजणे , जाणणे इत्यादी जे शब्द वापरतो त्या संदर्भात या शब्दाचा अर्थ पहावा किंवा त्याची चर्चा इथे घेत आहे .
एक छोटेसे उदाहरण घेऊ..
समजा डोळे बंद करून बसलेल्या मांणसासमोर एक गुलाबाचे फुल ठेवले तर काय होईल .. तो म्हणेल समोर गुलाबाचा सुगन्ध येतो आहे तर इथे गुलाबाचे फुल आहे . इथे डोळे उघडे नाहीत केवळ गन्ध घेऊनच ही जाणण्याची क्रिया घडली आहे. आता तीच व्यक्ती जर डोळे बंदच ठेवले तर हात पुढे करून स्पर्शाने तिथे काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करेल तर तो फुलाच्या स्पर्श आणि सुवास यावरून अधिक खात्रीने म्हणेल की इथे गुलाबाचे फुल आहे . यापुढे जाऊन अजून खात्री करायची असेल तर तो डोळे उघडून पाहिलं तर त्याला परत ते फुल दिसेल तेंव्हा तो अजून जास्त खात्रीने हेच म्हणेल की हे फुल आहे.
थोडक्यात आता याचा थोडा विश्लेषण करून बघू. गुलाबाच्या फुलाचा सुगन्ध जेंव्हा आपल्या नाकानी घेतला त्यावेळी ती जी समवेदना आहे ती घ्राण मार्गानी मेंदू पर्यंत जाते .
मेंदू हे काय आहे याची तुलना त्याच्या आठवणीतील इतर सुगंधाशी करतो व त्याला असे जाणवते की हा वास गुलाबाशी मिळतो आहे हे जे काही संदेश आहेत हे तो त्या सर्वोच्च अधिकारी म्हणजे आत्म्याला मनाच्या माध्यमातून कळवतो.
हे सर्व घडल्यावर आत्मा जो सर्व जाणण्याच्या प्रक्रियेचा अधिष्ठाता आहे तो मग हे गुलाबाचे फुल आहे हा निर्णय करतो या प्रक्रियेतील तीन मुख्य भाग आहेत
जाणणारा
जाणण्याची प्रक्रिया
जाणण्याची वस्तू
यांना म्हणतात त्रिपुटी जर यापैकी एकही नसेल तर ही आकलन होण्याची क्रिया होऊ शकत नाही.
हाच प्रकार आहे स्पर्शाने जाणण्याचा तसेच डोळ्याने पाहण्याचा पण आहे.
अगदी तोंडात साखर दिली तर गोड लागणे ही क्रिया सुद्धा याच क्रमाने होते. असो आकलन म्हणजे जाणणे या अर्थाने केवळ जाणणारा जो आत्मा आहे तोच जाणतो आणि त्यातील ज्या सर्व क्रिया आहेत त्या इतक्या स्वाभाविक पणे होतात की आपल्याला यातील बारकावे समजतच नाहीत.