Art, asked by like19, 2 months ago

१) आकलनातील 'तर्कपातळी' या घटकाची संकल्पना स्पष्ट करा.BA / bcom( correct one)​

Answers

Answered by likefreefire1
5

(आ) तर्कपातळी

ही आकलनाची दुसरी पातळी. काही वेळा केवळ वाच्यार्थ कळून उपयोग नसतो. तर शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये दडलेला गर्भितार्थ समजणे आवश्यक असते. कधीकधी वाचताना अर्थ समजण्यासाठी काही तर्क किंवा अनुमान करावे लागते. परिच्छेदातील / वाक्यातील माहितीवरून पुढचे-मागचे संदर्भ अनुमानाच्या आधारे जाणावे लागतात. उदाहरणार्थ, तुम्ही पुण्याला राहात आहात. तुमचा मुलगा, सून, नातवंडे (मोहन, मंजिरी व मुले) नाशिकला राहात आहेत. एक दिवस पुण्याला तुमच्या घरी तार आली. 'ताबडतोब निघा. वाट पाहत आहोत' - तुमची सौ. मंजिरी.

वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तर्कपातळीवर विचार करून उत्तर द्यावे लागते. म्हणून अशा आकलनाला तार्किक आकलन असे म्हणतात.

Similar questions