आळाशी कवितेचा भावार्थ
Answers
Answer:
म. टा. वृत्तसेवा, कर्जत
Explanation:
म. टा. वृत्तसेवा, कर्जत
आपल्या आजूबाजूला जे घडते ते मनात साचते आणि अचानक त्याला शब्दरूप मिळून त्याची कविता होते. अशा प्रकारे एखादा कवी किंवा लेखक प्रत्येकाच्या मनातील विचारांना कल्पनेतून साकारलो आणि आपल्यासमोर कवितेच्या रूपात ती भावना येते. पाठ्यपुस्तकांतून आपण अशा अनेक कविता अभ्यासतो. पाठ्यपुस्कात कविता असणारा कवी प्रत्यक्षात भेटला तर...ही कल्पना रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात प्रत्यक्षात उतरली. 'पाठ्यपुस्तकातील कवी मुलांच्या भेटीला' या उपक्रमाअंतर्गत कवी हनुमंत चांदगुडे हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटले.
चापडगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि कुतुहल जाणवत होते. इयत्ता आठवीच्या मराठीच्या अभ्यासक्रमातील 'आळाशी' या कवितेचे कवी हनुमंत चांदगुडे विद्यार्थ्यांच्या भेटीला आले आणि पाठ्यपुस्तकातील कवितेच्या कवीला प्रत्यक्ष समोर पाहून विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. कर्जत येथील कवयित्री स्वाती पाटील यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. हा संपूर्ण कार्यक्रम मुलांनी अतिशय कुतुहलाने आणि उत्सुकतेने ऐकला. कवी आणि गीतकार चांदगुडे यांच्या 'वासरु', 'अवती भवती मळ्यात', 'सवाल जवाब' आणि काही विनोदी कविता सादर केल्या. या वेळी मुले अक्षरश: कवितेच्या विश्वात रमून गेली होती. चांदगुडे यांनी त्यांच्या 'आळाशी' या कवितेचे अतिशय सुंदररित्या रसग्रहण केले. विद्यार्थ्यांनी हशा...टाळ्यांची बरसात केली.
कर्जत येथील कवयित्री स्वाती पाटील यांनीही, 'त्या पायवाटा, ती माती' या कवितेचं सादरीकरण करीत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. कवयित्री स्वाती पाटील यांनी या दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन केले होते. सामाजिक कार्यकर्ते आणि मुक्त पत्रकार सत्तार शेख हेही उपस्थित होते. महात्मा गांधी विद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य सुधाकर खेतमाळस, तसेच न्यू इंग्लिश स्कूल चापडगावचे मुख्याध्यापक पाटील यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
फोटो ओळ :
पाठ्यपुस्तकातील कवी आपल्या भेटीला या उपक्रमात कविता सादर करताना कवी हनुमंत चांदगुडे. मुख्याध्यापक सुधाकर खेतामळस व कवयित्री स्वाती पाटील, उपमुख्याध्यापिका चावरे आदी.