आळाशी कवितेचा भावार्थ .इयत्ता आठवी 15वी कविता
Answers
Answer:
hello did give me brainliest answer dont delete this
Explanation:
Answer: इयत्ता ८ वी मराठी आळाशी कविता सारांश
Explanation:
शेतात दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी बापाचे कष्टमय जीवन चितारताना कवि म्हणतात.
शेतकऱ्याच्या अनवाणी पावलांच्या खुणा शेतात उमटतात शेतकरी शेतात अपार कष्ट करतो शेतकऱ्याच्या अपार कष्टातून आकाशालाही पाझर फुटतो शेतकऱ्याचे राबणे पाहून ढग बरसतात म्हणजेच शेतकऱ्याच्या कपाळावरील घामाचा पान्हा नभाला फुटतो.
आकाशात पाण्याचे मेघ दाटतात जणु आकाशच पाणी होते व ते मातीत बरसल्यामुळे शेतात चिखल होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनातील कठीण कोडी सुटतात कुणब्याचे जीवन कसाला लागते भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाचा ऊर फाटतो हृदय गलबते तेव्हा शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा झरा आकाशातून खाली येतो त्याच्या कष्टाचे चीज होते.
शेतात कसताना माझ्या बापाचे हात पाय चिखलाने माखतात जणू त्याच्या हातापायांचा चिखल होतो आणि घामाने ओला झालेला असतो त्याही परिस्थितीत तो चिखलात राबतो त्याच्या मेहनतीतून जे पीक शेतामध्ये तरारते ते पाहून पाखरांचा थवा पिकांवर घिरट्या घालतो बाप जेव्हा शिवार पाहून आनंदाने आरोळी ठोकतो तेव्हा लहान मूल रडत रडत जागे होते म्हणजे बापाच्या आनंदाला ही दुःख व वेदना बिलगलेल्या असतात तेव्हा त्यांच्या घामाचा पाझर आभाळातून फुटतो.
शेतात सोडलेल्या पाटाच्या पाण्यातून बाप रक्त होऊन वाहतो बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आटवतो तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो जोंधळ्याच्या कणसावर हिरवेगार दाणे दिसू लागतात बाप त्यांचा हुरडा सगळ्यांना आनंदाने वाटतो बापाच्या रक्त नी घामातून कणसे बहरतात बाप कष्ट करतो तेव्हा नभाला पान्हा फुटतो
जोंधळ्याचे दाणेदार ताट जेव्हा शेतात लहरते तेव्हा बाप त्याची कापणी करतो ते काढतो स्वतः उपाशी राहून साऱ्या जगाचे पोट भरतो काढलेल्या पिकांचा जुडगा बांधायची आळशी तो स्वतः होतो तरीही त्याचा आळा का तुटतो हा प्रश्न आहे शेतकरी कष्टाने राहून शेतात धान्य पिकवतो तो जगाला पोसतो परंतु त्याचे जीवन मात्र हलाखीचे राहते असे शेवटच्या ओळीत सुचवायचे आहे खरे तर त्याच्या कपाळावरचा घाम नभामधून धारा च्या रूपाने बरसत असतो|
#SPJ3