• आम्ही मेंढरं मेंढरं यावं त्यानं हकालाव पाचा
वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव या
काव्यओळीचे कवी कोण आहे
Answers
Answer:
I don't no harsh hash Rwanda
आम्ही मेंढरं मेंढरं यावं त्यानं हकालाव पाचा वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव याकाव्य ओळीचे कवी विट्ठल वाग आहे .
विट्ठल वाग यांची कविता मेंढरं.
आमी मेंढरं मेंढरं
यावं त्यानं हकालावं
पाचा वर्साच्या बोलीनं
होते आमचा लिलाव।।
वारं वायदनं सुटे
आमी कावरे बावरे
नेता नेतो म्हने पार
आमी त्यच्या मांगं सारे
गोऴ बोलीत भाकर
दिसे रिकाम्या पोटाले
नाही कयेत सहेद
अस्ते सर्पाच्या ज्याले
तक वारुय निघावं ।।
आमी गरीब गरीबी
कोनी म्हनते हटोतो
पुनिवेच्या आशीवर
आमी अवस काढतो
वाट पाहून
डोये भिजले थिजले
" गाय " पन्हावली नाही
मुके वासर निजले
मांगं चालतो चालतो
कुठी लागेच ना गाव।।
ढोरासारखे कोंडले
श्वास मोकये झालेत
वाटे फर्दळं येतीन
सोंगलं त्या वावरात
पनं देवाच वांझोट
कसी टयनार माती
पिक चांदन्याचं यावं
तथी उलंगती राती
ज्याले शेंदूर फासला
निघे दगूळ तो देव।।
बापलेक गाजतात
मायलेक गाजोतात
आमच्या कातळ्याचे
रई लावतो लावतो
घाम गयते गल्लीत
हाती ताकाचंच पानी
लोनी लुटते दिल्लीत
आमच्याच आसवाले येते
आमचीच कीव
पाचा वर्साच्या बोलीनं
होते आमचा लिलाव ।।